कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात भीषण पाणी टंचाई

 कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात भीषण पाणी टंचाई

कल्याण, दि, 20 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या मुद्द्यावर महासभेत जोरदार गोंधळ पहायला मिळाला सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत नागरिकांच्या अडचणींचा पाढा वाचला.“ढगाला लागली कळ,पाणी थेंब थेंब गळं” हे शब्द उच्चारत शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक अर्जुन पाटील यांनी पाणीटंचाईची तीव्रता मांडली.त्यांनी आरोप केला की केडीएमसीचे काही अधिकारी-कर्मचारी सोसायट्यांकडून दरमहा 7 ते 8 हजार रुपये घेऊन पाणीपुरवठा करतात. परिणामी सामान्य नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात.एका कुटुंबाला केवळ स्वयंपाकासाठी दररोज 100 रुपयांत चार हांडे पाणी विकत घ्यावे लागत असल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणली.

महासभेत शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांनी इशारा देत सांगितले की,पाण्याचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर पुढील सभेत आंदोलन छेडले जाईल.कल्याण पश्चिमेतील अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,अशी तक्रारही यावेळी करण्यात आली.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *