mmcnews mmcnews

सांस्कृतिक

विठोबा-रुक्मिणी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम संपन्न

पंढरपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठोबा-रुक्मिणी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्तिकी एकादशीच्या पावन प्रसंगी विविध भागातील भाविकांनी मोठ्या उत्साहात विठुरायाचे दर्शन घेतले. विधिवत पूजा-अर्चा करत भाविकांनी श्रद्धेने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. पंढरपूर मंदिरात आज विशेष पूजा आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. विठोबा-रुक्मिणी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम संपन्न ML/ML/PGB12 Nov 2024Read More

देश विदेश

खलिस्तानी अतिरेक्याकडून अयोध्येतील राममंदीर उडवण्याची धमकी

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने एक नवीन व्हिडिओ जारी केला असून अयोध्येतील राम मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तो राम मंदिराला लक्ष्य करण्याबाबत बोलत आहे. दहशतवादी पन्नूने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, – […]Read More

राजकीय

दिव्यांग मतदारांची प्रत्येक मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): विधानसभा निवडणूकीत मुंबई कार्यक्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आणि प्रत्येक केंद्रावर ‘व्हीलचेअर’ तसेच मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण १७ हजार ५४० आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ६ हजार ३८७ असे मिळून एकूण […]Read More

शिक्षण

आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक वधारला

क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी नुकतीच आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी करत मोठी झेप घेतली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे रॅंकींगमध्ये दिसून आले आहे. मुंबई विद्यापीठाने गतवर्षीच्या तुलनेत सर्वच निकषात मोठी सुधारणा करत 291 ते 300 या बँडमधून बाहेर पडत थेट 245 क्रमांकावर झेप […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अजितदादांनी केली आपल्या निवृत्तीच्या वयाची घोषणा

बारामती, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोखठोक भूमिका घेऊन परखडपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या राजकारणातील निवृत्तीच्या वयाबाबत महत्त्वाची माहिती दिली. बारामतीमधल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी आपण निवृत्त कधी होणार यावरही भाष्य केलं आहे. ‘साहेब कधी थांबले? मी साहेबांचं ऐकायचं ठरवलं आहे. साहेब 85 ला थांबतील, […]Read More

ट्रेण्डिंग

रत्नागिरीतील एक हजारहून अधिक हापूस बागायतदारांनी केली GI नोंदणी

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी, कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे.रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला ३ वर्षापूर्वी ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा ‘देवगड हापूस’ तर रत्नागिरीचा हापूस ‘रत्नागिरी हापूस’ नावाने ओळखला […]Read More

देश विदेश

भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांनी घेतली

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सकाळी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. यावेळी मावळते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ […]Read More

विज्ञान

जपानने प्रक्षेपित केला जगातील पहिला लाकडी उपग्रह

टोकियो, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाश संशोधन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जपानने आता लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट प्रक्षेपित केला. हे उपग्रह ६ महिने अंतराळात राहील आणि तापमानापासून ते वैश्विक किरणोत्सर्गापर्यंत सर्व बाबींची चाचणी करणार आहे. या उपग्रहाची रचना मॅग्नोलिया लाकडापासून बनवण्यात आली आहे. लिग्नोसेट पूर्णपणे मॅग्नोलिया लाकडापासून बनविला आहे, ते फक्त १० […]Read More

राजकीय

राज्यात 165 पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील

सांगली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात महायुतीला 165 हून जास्त जागा मिळतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला आहे. सांगली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी तावडे हे सांगलीत आले होते. नंतर विनोद तावडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जातीनिहाय जनगणनेच्या आड राहुल गांधी यांना मुस्लिम समाजाला आरक्षण […]Read More

ट्रेण्डिंग

आयर्नची झाली ‘अनाया’: संजय बांगार यांच्या मुलाने केली हॉर्मोन रिप्लेसमेंट

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगार यांच्या मुलाने आपली लिंग ओळख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्न बांगारने आता हॉर्मोन रिप्लेसमेंट सर्जरीद्वारे आपले नाव ‘अनाया’ असे ठेवले आहे. ही सर्जरी केल्यानंतर आयर्न आता अनाया म्हणून ओळखली जाईल. आपल्या जीवनातील या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल अनाया स्वतःला आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करत असून तिने या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.Read More