आयर्नची झाली ‘अनाया’: संजय बांगार यांच्या मुलाने केली हॉर्मोन रिप्लेसमेंट सर्जरी
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगार यांच्या मुलाने आपली लिंग ओळख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्न बांगारने आता हॉर्मोन रिप्लेसमेंट सर्जरीद्वारे आपले नाव ‘अनाया’ असे ठेवले आहे. ही सर्जरी केल्यानंतर आयर्न आता अनाया म्हणून ओळखली जाईल. आपल्या जीवनातील या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल अनाया स्वतःला आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करत असून तिने या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.