mmcnews mmcnews

राजकीय

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असून, बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातून लोकांनी अश्रुपूर्ण निरोप दिला. पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी अजित पवार यांच्या खाजगी विमानाचा भीषण अपघात झाला. लिअरजेट ४५ (Learjet 45) हे विमान उतरत असताना कोसळले आणि […]Read More

करिअर

मुंबईमध्ये AI इंजिनिअर्सना नोकरीच्या मोठ्या संधी

मुंबई, दि. २९ : मुंबईतील रोजगार बाजारपेठेत २०२६ मध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. लिंक्डइनच्या संशोधनानुसार, ७२ टक्के भारतीय प्रोफेशनल्स नवीन पदांचा शोध घेत आहेत, मात्र ३८ टक्के जणांना तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांची कमतरता जाणवते. या पार्श्वभूमीवर लिंक्डइनने “जॉब्स ऑन द राइज २०२६” यादी जाहीर केली आहे. मुंबईत एआय इंजिनिअर हे सर्वाधिक वेगाने वाढणारे […]Read More

ट्रेण्डिंग

घरगुती गॅस सिलिंडर होणार 50% हलका आणि पारदर्शक

मुंबई, दि. २९ : वाहतूकीसाठी आणि वापरासाठी अवजड असलेला लोखंडी टाकीच्या घरगुती गॅस सिलेंडरचे वजन आता अर्धे होणार आहे. तसेच तो पारदर्शक असल्यामुळे किती गॅस शिल्लक आहे हे देखील स्पष्टपणे दिसणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या मोठ्या कंपनीने घरगुती वापरासाठी एक नवीन प्रकारचे एलपीजी सिलिंडर सुरू केले आहे. या सिलिंडरला ‘भारतगॅस लाइट – […]Read More

देश विदेश

EU सोबतच्या करारामुळे हिमाचलमधील सफरचंद उत्पादक अडचणीत

शिमला, दि. 29 : भारत सरकार आणि युरोपीय युनियन (EU) यांच्यात बुधवारी मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी झाली. यामुळे अमेरिकेने भारतासमोर निर्माण केलेल्या अडचणी काहीशी दूर झाल्या आहेत. मात्र या कराराचा तत्काळ परिणाम म्हणून या करारानंतर EU च्या सफरचंदांवरील आयात शुल्क 50 वरून 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. यामुळे हिमाचलमधील 5500 कोटी रुपयांच्या सफरचंद […]Read More

करिअर

UGCच्या नवीन नियमांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

नवी दिल्ली, दि. 29 : १५ जानेवारी पासून UGC ने आमलात आणलेल्या नवीन नियमांना देशभरातून विरोध होत होता. आयोगाच्या मते या नियमांचा उद्देश्य कॉलेज आणि विद्यापीठातील भेदभाव समाप्त करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे हा आहे. मात्र काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते या कठोर नियमांमुळे शिक्षणाचा दर्जा घसरु शकतो. अखेरीस आज सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान […]Read More

ट्रेण्डिंग

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू

बारामती, दि. २८ : आज सकाळीच आलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करून गेली आहे. Learjet 45 या अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड विमानाने बारामतीमध्ये लँडींग करताना हवेत गिरट्या घेतल्या अन् क्षणार्धात ते खाली कोसळले. येथील एका शेतात कोसळताच विमानाचा मोठा स्फोट झाला अन् उपमुख्यमंत्री अजित पवार, पायलट कॅप्टन […]Read More

राजकीय

राजकारण नाही, हा निव्वळ अपघात – शरद पवारांकडून स्पष्ट

बारामती, दि. २८ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यानंतर दिल्ली येथे असलेले पवार कुटुंबिय तातडीने बारामती येथे दाखल झाले. बारामतीतील शोकाकूल नागरिकांना अजित दादांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. याच वेळी या अपघाताबद्दल प्रसारमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]Read More

मनोरंजन

Border-2 ने मोडला ‘धुरंधर’ चा रेकॉर्ड

मुंबई, दि. २८ : बॉलिवूडमध्ये नवा इतिहास घडला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला बॉर्डर-2 या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर करत विक्रमी यश मिळवले असून, यामुळे धुरंधर या चित्रपटाचा जुना रेकॉर्ड मोडला आहे. बॉर्डर-2 या चित्रपटाने प्रदर्शित होताच विक्रमी यश मिळवत धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या पाच दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ₹193 कोटींची कमाई केली असून, […]Read More

ट्रेण्डिंग

पेन्शन हा कायदेशीर हक्क, सरकारी खैरात नाही

मुंबई, दि. 28 : पेन्शन हा एक मौल्यवान कायदेशीर हक्क आहे. त्याला सरकारच्या मर्जीनुसार दिलेला दानधर्म म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि केंद्र सरकारने दाखल केलेल्या अनेक याचिका फेटाळून लावल्या. लष्करी कर्मचाऱ्यांना अपंगत्व पेन्शन देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते. तथापि, न्यायालयाने पेन्शनला कायदेशीर हक्क मानून केंद्र सरकारच्या सर्व रिट याचिका फेटाळून […]Read More

ट्रेण्डिंग

IAS-IPS च्या कॅडर वाटपाचे नियम बदलले

नवी दिल्ली, दि. २८ : भारत सरकारने UPSC कॅडर वाटपासाठी 2017 पासून सुरू असलेली ‘झोन सिस्टीम’ व्यवस्था रद्द केली आहे. त्याऐवजी नवीन ‘कॅडर वाटप धोरण 2026’ लागू करण्यात आले आहे. यानुसार आता ‘सायकल सिस्टीम’द्वारे अधिकाऱ्यांच्या कॅडरचे वाटप केले जाईल. हे धोरण भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFoS) साठी […]Read More