MOVITRAPS रोखणार डासांची उत्पत्ती

 MOVITRAPS रोखणार डासांची उत्पत्ती

मुंबई, दि. १८ : पावसाळ्यात मलेरियासह डेंग्यू, झिका, चिकनगुनिया यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांना आता नियंत्रण ठेवता येणार आहे. मुव्ही ट्रॅप’ या वापरण्यास अत्यंत सुलभ असणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या सापळ्याकडे त्यातील ‘ॲट्रॅक्टन्ट्स’मुळे डासाची मादी आकृष्ट होते आणि त्यातील पाण्यात अंडी घालते. ही अंडी पाण्यातील वैशिष्ट्यपूर्ण कीटकनाशकांमुळे तात्काळ नष्ट होतात. अशाप्रकारे डासांच्या उत्पत्तींवरच अर्थात मुळावरच घाव घातला जात असल्याने डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध होतो.

‘मुव्ही बायो ट्रॅप हे ‘पॅसिव्ह’ आणि पर्यावरणाला अनुकूल असणारे उपकरण आहे. इको बायो ट्रॅप हे आकाराने छोटी असल्यामुळे ते घरामध्ये सहजपणे ठेवता येते. हे उपकरण लार्व्हा स्रोत व्यवस्थापनासाठी प्रभावी आहे. ‘इको बायो ट्रॅप’मुळे डासांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि चिकनगुनिया, डेंग्यू, झिका आणि मलेरियाच्या प्रादुर्भावाच्या वेळी सध्याच्या एकात्मिक डास नियंत्रण व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये याचा समावेश होऊ शकतो, अशी माहिती फडके यांनी दिली.

ट्रॅपमध्ये असणाऱ्या पिशवीतील ॲट्रॅक्टंट व कीटकनाशक (कीटक वाढ नियामक आयजीआर ग्रॅन्युअल) हे पाण्यात तत्काळ मिसळले जातात. ज्यानंतर पाण्यातील ॲट्रॅक्टंटमुळे डासाची मादी या पाण्याकडे आकर्षित होते व पाण्यात अंडी घालते तर पाण्यात असणारे सौम्य स्वरूपाचे कीटकनाशक डासांची अंडी नष्ट करते. डासांची अंडीच नष्ट झाल्यामुळे त्यांच्या प्रजोत्पादनाला प्रतिबंध होतो व पसरणाऱ्या आजारांनादेखील प्रतिबंध होतो.

‘मुव्ही ट्रॅप’मध्ये असलेले पाणी हे साधारणपणे ४ आठवडे साठवून ठेवता येते. या सापळ्यात वापरण्यात आलेली ॲट्रॅक्टंट व कीटकनाशक ही माणसासाठी सुरक्षित आहेत. त्याचबरोबर डास प्रतिबंधासाठी वापरण्यात येणाऱ्या इतर यंत्रांप्रमाणे या सापळ्याला वीजदेखील लागत नाही.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *