स्वामी समर्थ मठ, परळ येथील वर्धापन दिन जल्लोषात
मुंबई प्रतिनिधी, दि. 18 : स्वामी समर्थ मठ परळ येथील मठामध्ये मोठ्या जल्लोषात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. स्वामींच्या मंदिरामध्ये आंब्याची आरास साकारण्यात आली होती. हे आंबे कोकणातील हापुस आंबे होते. वर्धापन दिनानिमित्त मठामध्ये निरनिराळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वामी समर्थांचा याग या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आला. हा यात पूर्ण महिनाभर सुरू राहणार असून मोठ्या संख्येने या या यामध्ये स्वामी समर्थांच्या भाविकांनी सहभाग घेतला होता. वर्धापन दिनानिमित्त स्वामींची आरती, पूजा, भजन आणि भंडार्याचा स्वामी भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. आम्ही दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त स्वामींचे निर्णया फळांची फुलांची आरास साकारत असतो. यावर्षी आम्ही हापूस आंब्याची आरसा साकारून स्वामींची आंब्यांनी वाडी भरली. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त मठामध्ये निरनिराळे उपक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये भाविकांसाठी विविध प्रकारचे आरोग्य शिबिर तसेच मोफत नेत्र चिकित्सा शिबीर ठेवून भाविकांना मोफत चष्मा वाटप केले जाते. यावेळी देखील आम्ही भाविकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारच्या आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती स्वामी समर्थ मठ परळ येथील मठाचे प्रमुख सचिन शेट्टे यांनी दिली.