mmcnews mmcnews

राजकीय

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधानमंडळातर्फे सत्कार

मुंबई दि ४ :- महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा 8 जुलै, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता, मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. ही घोषणा आज विधानपरिषद सभागृहात सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर विधानसभेत अध्यक्ष […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय संरक्षण अकादमीत

मुंबई दि ४ — केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, खडकवासला, पुणे येथे ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण’ करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना वयाच्या 19-20 व्या वर्षी पेशवेपदाची वस्त्रे दिली. आपल्या […]Read More

राजकीय

‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम

मुंबई, दि. ४ — महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा घणाघात […]Read More

कोकण

सावंतवाडी जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली.

सिंधुदुर्ग दि ४– सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सावंतवाडी कारागृहाची किमान शंभर वर्षे जुनी मुख्य सुरक्षा भिंत आज दुपारी कोसळली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. सुरक्षेसाठी सर्व कैद्यांना सिंधुदुर्ग येथील कारागृहात हलवण्यात आले. सावंतवाडी कारागृह हे संस्थानकालीन कारागृह आहे. ML/ML/MSRead More

गॅलरी

आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्ताने सोमेश्वर फाउंडेशनतर्फे उपक्रमाचे आयोजन*

पुणे, दि ४ – कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ’विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपाचा हा […]Read More

राजकीय

नियमबाह्य जमीन परवाने देणारा अधिकारी निलंबित, उर्वरित आठ जणांची चौकशी

मुंबई दि ४– नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तुकडेबंदी कायद्याची पायमल्ली करून सरकारी रक्कम जमा न करता जमिनींच्या परवानग्या दिल्याप्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची आणि आठ नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. याबाबतचा मूळ प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. दोन सलग जमिनींची अदलाबदल करण्याचे अधिकार असताना दोन स्वतंत्र […]Read More

राजकीय

पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांना दमदाटी, उच्चस्तरीय चौकशी जाहीर

मुंबई दि ४ — धाराशीव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याप्रकरणी येत असलेल्या सर्व तक्रारींची पोलिस महानिरीक्षकाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील लक्षवेधी कैलास पाटील यांनी उपस्थित केली होती. पवनचक्की कंपन्यांचे दलाल स्थानिक गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात, शेतकऱ्यांना चेक […]Read More

राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांनानोंदणी शुल्काची रक्कम त्वरित…

मुंबई दि ४ — राज्यातील मालमत्ता खरेदी विक्रीची नोंदणी झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्शाचा एक टक्का रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल , यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडून त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना रणधीर सावरकर यांनी उपस्थित केली होती. सध्या राज्यातील […]Read More

राजकीय

तालिका अध्यक्षांनी केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप

मुंबई, दि.४ – शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव दिले होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. यावर विरोधकांनी विधानसभेत आक्षेप घेतला. या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तरी कामकाज सुरू ठेवले होते. पण काही […]Read More

गॅलरी

“माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित*

पुणे, दि ४पंढरपूरच्या आषाढी वारीचं औचित्य साधत आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत “माय गो विठ्ठल” नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या अभिनयाने सजलेलं हे गीत आहे. अमृतासोबत गाण्यात वैभवी पवार आणि बालकलाकार शार्वी बागडे यांनी काम केले आहे. गाण्याच्या संगीताची धुरा निनाद म्हैसाळकर यांनी सांभाळली […]Read More