mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

देशातील अनेक राज्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद, हॉटेल व्यवसाय

नवी दिल्ली, दि. १० : इराणच्या हॉर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर भारत सरकारने आता देशभरात ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ लागू केला आहे. हे पाऊल उचलले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घातली आहे. या बंदीमुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद होण्याची […]Read More

ट्रेण्डिंग

नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू

नवी दिल्ली, दि. १० : अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (दि.१०) Essential Commodities Act, 1955 (आवश्यक वस्तू कायदा) लागू केला आहे. नैसर्गिक वायू आणि एलपीजीचा पुरवठा खंडित होऊ नये तसेच घरगुती गॅस उपलब्धता कायम राहावी, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, नैसर्गिक वायूचा […]Read More

महानगर

पालिका क्षेत्रातील गायरान जमिनी आता शासनाच्या ताब्यात

मुंबई, दि. ९ : राज्यातील नगरपरिषदा आणि महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे पावणे आठ हजार हेक्टर इतक्या गायरान जमिनी संबंधित पालिकांना सार्वजनिक प्रयोजनांच्या वापरासाठी देणेकामी शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत हे विधायक मांडले होते. या सुधारणा विधेयकात नमूद केल्याप्रमाणे महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमीन आरक्षण उठवले जाणार […]Read More

ट्रेण्डिंग

आता 25 दिवसांनंतरच बुक करता येईल गॅस सिलिंडर

मुंबई, दि. 9 : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर तब्बल 60 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता गॅस मिळण्यासाठी अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता ग्राहक एक सिलेंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलेंडर 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनंतरच […]Read More

पर्यावरण

मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह

पालघर, दि. ९ : पालघरच्या किनारपट्टीवर प्रस्तावित ‘मुरबे मल्टिकार्गो बंदरा’च्या पर्यावरणीय परिणाम अहवालातील (EIA) गंभीर त्रुटी आता केंद्र सरकारच्या स्तरावर उघड झाल्या आहेत. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या केंद्र सरकारच्या तज्ज्ञ मूल्यमापन समितीच्या (EAC) ४३६ व्या बैठकीत या प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. समितीने प्रकल्पाच्या अहवालात तब्बल २० गंभीर त्रुटी नोंदवत प्रस्तावाला सध्या स्थगिती […]Read More

ट्रेण्डिंग

बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेची गोष्ट आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. लाडकी बहीण’ या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला दिनाच्या निमित्तानं ही घोषणा करण्यात आली. ‘१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमात अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत सुरेखा […]Read More

बिझनेस

Meesho कंपनीला १५०० कोटींची टॅक्स नोटीस

मुंबई, दि. 9 : ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी Meesho ला आयकर विभागाने १,५०० कोटी रुपयांच्या कर मागणीची नोटीस बजावली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण होऊन गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. Meesho च्या एक्सचेंज फायलिंगनुसार, आयकर विभागाने २०२३-२४ या मूल्यांकन वर्षासाठी एकूण १,४९९.७३ कोटी रुपयांच्या कराची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम कंपनीच्या […]Read More

देश विदेश

प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान

काठमांडू, दि. ९ : नेपाळच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला आहे. लोकप्रिय रॅपर आणि काठमांडूचे माजी महापौर बालेंद्र (बालेन) शाह यांची पंतप्रधानपदी निवड निश्चित झाली आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाने, राष्ट्रिया स्वतन्त्र पार्टी (RSP) ने बहुमत मिळवले असून शाह हे नेपाळच्या संसदीय इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरणार आहेत. शाह यांचा प्रवास अत्यंत वेगळा आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

आंतरराष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या मुंबई मनपाच्या मोफत शाळा

मुंबई, दि. ७ : मुंबई मनपा अंतर्गत CBSE, ICSE, IB आणि IGCSE अशा विविध बोर्डांच्या 18 CBSE, 1 ICSE, 1 IB आणि 1 IGCSE शाळा आहेत. यात 13 हजार 316 विद्यार्थी नर्सरी ते दहावीपर्यंत मोफत शिकतात. या वर्षाच्या अर्थसंकल्पात आणखी एक CBSE शाळा सुरू करण्याची योजना आहे. माटुंगा येथील LK वाघजी शाळा कॅम्ब्रिज IGCSE संलग्न […]Read More

देश विदेश

१० प्रवाशांना घेऊन उडणारी चीनची इलेक्ट्रिक Air Taxi

बिजिंग, दि. ७ : चीनमधील शांघाय बंदराजवळील औद्योगिक शहरात एका भव्य हँगरमध्ये एका महाकाय ड्रोनच्या प्रतिकृतीचे प्रात्यक्षिक पार पडले, ज्याने उपस्थितांचे आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या अत्याधुनिक विमानाला ‘मॅट्रिक्स’ (Matrix) असे नाव देण्यात आले असून, हे एक ‘इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग’ (eVTOL) प्रकारचे वाहन आहे. सुमारे ५ टन वजन असलेले […]Read More