Month: March 2024

पर्यावरण

प्रदूषण रोखण्यासाठी ‘पार्किंग’ व्यवस्थापन करा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समन्वय समितीने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील हवेच्या घसरत्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमएमआरमधील महानगरपालिका आणि नगरपालिकांना पार्किंगच्या काटेकोर व्यवस्थापनासह निर्देश जारी केले आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 अन्वये अधिकृत केलेले हे निर्देश, मुंबई उच्च […]Read More

राजकीय

महाविकास आघाडीतील दोन जागांवरील पेच चर्चेतून सुटेल

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली आणि भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष […]Read More

राजकीय

महायुतीचे जागा वाटप ९९ टक्के, तटकरेंची उमेदवारी जाहीर

पुणे, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल.आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघासाठी […]Read More

विदर्भ

चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

चंद्रपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दिग्गज भाजप नेते राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. आज सकाळी परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन त्यांनी गांधी चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत सभेला […]Read More

महाराष्ट्र

अनोख्या परंपरेची दाजीबा वीर यात्रा

नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुमारे 300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या दाजीबा वीरांची मिरवणूक आणि घरोघरी दाजीबा वीरांचे पूजन औक्षण होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी संपन्न झाले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील धानोरी दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाटा येथील मंदिर आणि नाशिक शहरात दाजीबा वीर पूजनाची आणि मिरवणुकीची ही ऐतिहासिक परंपरा आहे. ऐतिहासिक आख्यायिकेनुसार […]Read More

विदर्भ

नागपूर लोकसभा, विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज सादर

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला. त्यांच्यासोबत काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री सुनील केदार , आमदार अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते उपस्थित होते. […]Read More

देश विदेश

आपनं सुरु केलं डीपी कॅम्पेन

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण आम आदमी पार्टीनं यावरुन दिल्लीत रान पेटवलं आहे. केजरीवालांच्या अटकेपासून पक्षानं तिथं आंदोलनं सुरु केली आहेत. तसेच केंद्र सरकारवर टीकात्मक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यातच आता आपनं डीपी कॅम्पेन सुरु केलं आहे. तसेच ज्यांचा मोदींना […]Read More

राजकीय

काँग्रेसकडून लोकसभेसाठी ६वी यादी जाहीर

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली आहे. यात राजस्थानमधील 4 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे आणि तामिळनाडूतून एक उमेदवार आहे. म्हणजेच या यादीत एकूण 5 नावांचा समावेश आहे. काँग्रेसच्या या यादीत राजस्थानच्या कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रल्हाद गुंजाळ हे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांचा […]Read More

कोकण

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेचं आगमन

राजापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं सहा महिन्यांनी पुन्हा एकदा आगमन झालं आहे. मुख्य काशिकुंडासह चौदाही कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं आहे. २०१३पूर्वी गंगा साधारण तीन वर्षांनी यायची आणि सर्व कुंडं कोरडी व्हायची. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दर वर्षी गंगा अवतीर्ण होत असून, सर्व कुंडांमधलं पाणी जात नाही. आता फाल्गुन […]Read More

पर्यावरण

‘पर्यावरणपूरक-प्रदूषण मुक्त’ होळी

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एमआयडीसी निवासी भागात शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यावर्षी होळी पौर्णिमा ही गाईचे शेणापासून बनविलेल्या लाकडापासून म्हणजेच गोकाष्ट याची पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त होळी साजरी करण्यात आली. एमआयडीसी मध्ये रासायनिक आणि इतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याने वृक्षांवर आघात न करता आणि त्यात लाकूड जाळून प्रदूषणाची आणखी भर न घालता जर […]Read More