जालना, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या एर्टिगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने अपघात होऊन त्यात सात जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली,नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली. […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूदअसलेला आणि त्यात शेतकऱ्यांना मोफत वीज , महिलांना अर्थ सहाय्य , मोफत सिलेंडर देणारा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आज विधिमंडळात सादर करण्यात आला. महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुरुवातीला फुकट सिमकार्ड्स वाटून गेली काही वर्षे ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन्स देऊन रिलायन्सच्या Jio ने दूरसंचार मार्केटमध्ये जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर आता आपले व्यावसायिक रंग दाखवत रिलायन्स जिओने त्यांचे अनेक असलेले रिचार्स प्लॅन महाग करुन करोडो यूजर्सना आज मोठा धक्का दिलाय. कंपनीने त्यांच्या असलेल्या एकूण १९ योजनांची यादी […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेन्नईच्या चेपॉकवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची सलामीवीर शेफाली वर्माने ऐतिहासिक कामगिरी करत द्विशतक झळकावले आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान डबल सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड शेफाली वर्मानं . शेफालीनं १९४ बॉलमध्येच डबल सेंच्युरी पूर्ण केली. आज भारताने […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्रेनमध्ये सामान चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. याबाबत तक्रारही नोंदवली जाते. मात्र प्रवाशांना हरवलेले सामान परत मिळण्याच्या घटना मात्र फारच विरळ आहेत. अशाच एका तक्रारीत तक्रारदार महिलेला ग्राहक मंचाच्या आदेशानंतर रेल्वेकडून तब्बल १ लाख ८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. दिल्लीतील एका महिलेची ट्रेनमध्ये बॅग […]Read More
झालवाड,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NTA कडून घेण्यात आलेली NEET 2024 ची परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दररोज देशाच्या विविध भागांतून या परीक्षेदरम्यानच्या गैरप्रकारांत सहभाग असलेल्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. आज या प्रकरणी डमी उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या MBBS च्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने NEET […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या देशाच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून विविध अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाते. भारतीय सैन्यदलासाठी आता एक विशेष बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्यात आले आहे. हे वजनाने सर्वात हलके असलेले हे बुलेटप्रूफ जॅकेट असून एके- ४७ टी गोळीही त्याला भेदू शकणार शकणार नाही, […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला आहे. अडीच वर्ष फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे. महिलांसाठी योजना आणून या सरकारने प्रायश्चित्त घेतले आहे. अशा शब्दात विधानसभा […]Read More