mmcnews mmcnews

विदर्भ

गुटखा विक्री साठी मोक्का आणि भिवंडीत विशेष मोहीम

नागपूर दि ९ : राज्यातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पान , तंबाखू , अंमली पदार्थ पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांवर कायद्यात बदल करून अशा लोकांवर मोक्का लावण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. याशिवाय भिवंडीत याबाबत एक विशेष मोहीम राबविण्यात येईल असेही ते म्हणाले. […]Read More

विदर्भ

फलटण, महिला डॉक्टरची आत्महत्या फसवणूक आणि शारीरिक शोषणामुळेच

नागपूर दि ९ : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी अटकेत असणारा संबंधित पोलिस अधिकारीच जबाबदार असून , त्यानेच तिचे शारीरिक शोषण आणि फसवणूक केल्याचे आजवरच्या तपासात उघडकीस आलं आहे, तिच्या हातावरील हस्ताक्षर तिचंच आहे आणि गळफास लावून घेऊनच ती आत्महत्या झाली असल्याचं ही तपासात निष्पन्न झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

ट्रेण्डिंग

दुचाकी वाहनांना मिळणार पसंतीचा नोंदणी क्रमांक

मुंबई,दि. ८ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी मालिकेत बदल करण्यात आला आहे. एमएचओ-२-जीक्यू ही चालू मालिका संपुष्टात येत आहे. नवीन एमएचओ जीआर मालिका लवकरच सुरू होणार असून आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आरटीओकडून जाहीर करण्यात आली आहे.एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्या क्रमांकांची यादी कार्यालयाच्या नोटीस […]Read More

देश विदेश

आजही Indigo ची 400 हून अधिक विमाने रद्द

मुंबई, दि. ८ : Indigo Airlines ने देशभर घातलेल्या अभूतपूर्व गोंधळाच्या आजच्या सलग सातवा दिवशीही ४०० हून अधिक विमाने रद्द करण्यात आली. गेल्या मंगळवारपासून देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी असलेल्या इंडिगोने ४,५०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द केली आहेत, ज्यामुळे हा त्यांच्या इतिहासातील सर्वात गंभीर विमान वाहतूक संकट ठरला आहे.सोमवारी इंडिगोच्या संकटाचा परिणाम त्यांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’ – शिंदेंच्या बंडावर येतंय पुस्तक

मुंबई, दि. ८ : सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केले होते. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. शिवसेनेच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या बंडावर ‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’ असं पुस्तक लिहिण्याचा आणि लेखक बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस उदय सामंत यांनी बोलून […]Read More

साहित्य

१३ ते २१ डिसेंबर दरम्यान NBT आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सव’

पुणे, दि. ८ : राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT) द्वारे १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव ’होणार आहे. भारतीय भाषांमधील पुस्तकांची ८०० दालने, लिटरेचर फेस्टिव्हल, बालकांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर, लेखकांसाठी ऑर्थर कॉर्नर, दररोज पुस्तकांची प्रकाशने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा एकापेक्षा एक कार्यक्रमांनी यंदाचा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाला […]Read More

शिक्षण

UGC ची भारतीय भाषा-केंद्रित शिक्षण प्रणाली

नवी दिल्ली,, दि. ८ : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि शिक्षण मंत्रालय एकत्र येऊन ‘इंग्रजी-प्रबळ चौकटीतून’ बाहेर पडून ‘भारतीय भाषा-केंद्रित शिक्षण प्रणाली’ विकसित करत आहेत. याचाच एक भाग म्हणून, विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी “आणखी एक भारतीय भाषा शिका” हा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. या नव्या नियमांमुळे बहुभाषिक […]Read More

ट्रेण्डिंग

भारतातील या रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव

अमरावती, दि. 8 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने हैदराबादमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासालगतच्या रस्त्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव तेलंगणा सरकारने रविवारी (७ डिसेंबर) मांडला आहे. यानुसार, हा हाय-प्रोफाइल रस्ता ‘डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू’ म्हणून ओळखला जाईल. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, या निर्णयाची माहिती राज्य सरकार लवकरच केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाला आणि अमेरिकन दूतावासाला अधिकृतरित्या देणार […]Read More

महानगर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नोवेल साळवे यांचे मुंबई

मुंबई, दि ८: प्रतिनिधी माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी अजून मोकाट असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारींवर बडतर्फाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र सरकार हिवाळी अधिवेशन च्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

“जीडीसी टेक मेगा इव्हेंट २०२५” यशस्वीरित्या संपन्न

पुणे, दि ८: शहरात ३ दिवस चाललेला  “जीडीसी टेक मेगा इव्हेंट २०२५” यशस्वीरित्या संपन्न झाला. देश-विदेशातून आलेल्या ५,००० हून अधिक अभ्यागतांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. या भव्य आयोजनातून भारतीय अॅल्युमिनियम डाय कास्टिंग उद्योग जागतिक पातळीवरील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय  मंत्री  सुरेश प्रभू यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. […]Read More