mmcnews mmcnews

मराठवाडा

100 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा.

छ संभाजीनगर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज खिचडी ऐवजी पोष्टिक आहार म्हणून दिलेल्या बिस्किटातून शंभरावर विद्यार्थ्याना विषबाधा झाली. बिस्किटे खाल्ल्या नंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊन त्या विद्यार्थ्याना ताप आला. विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडल्याने शिक्षक आणि पालकांनी 120 विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी […]Read More

मराठवाडा

बीड जिल्ह्यात पावसामुळे नद्या नाल्यांना पूर

बीड दि १७– जिल्ह्यात अनेक भागात काल रात्री जोरदार पाऊस झाला.जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कडी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे तयार केलेला तात्पुरता पूल वाहून गेला. सकाळपर्यंत या पुलावरून वाहतूक होत होती.मात्र सकाळी अचानक नदीला पाणी वाढल्याने तयार केलेला तात्पुरता पूल वाहून गेला.हा पूल वाहून जाण्याची ही दुसरी घटना आहे. पूल वाहून गेल्यानंतर नगर बीड […]Read More

Uncategorized

अहमदनगर तालुक्यात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा संपर्क तुटला

अहमदनगर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर तालुक्यातील साकत परिसरात शुक्रवारी सायंकाळी शनिवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे साकत परिसरातील नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले. यामुळे अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला. […]Read More

Lifestyle

कुरमुर्‍याचा चिवडा

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  कुरमुरे (एक मोठे पाकीट), भरपूर / आवडीनुसार लसूण, आवडीनुसार कढिपत्ता, आवडीनुसार/ चवीनुसार/ घरातल्या माणसांच्या वयोगटानुसार हिरव्या तिखट मिरच्या, हळद, मीठ, हिंग, मोहरी. ऑप्शनल : शेंगदाणे, डाळे, सुकं खोबरं. क्रमवार पाककृती:  कुरमुरे नीट निवडून, पाखडून घ्या. कढिपत्ता नीट धुऊन सुकवून घ्या. मिरच्या […]Read More

पर्यटन

“चटपाल” शहराचे निसर्गसौंदर्य तुलना करण्यापलीकडे

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मीर खोरे त्याच्या नयनरम्य ठिकाणांसाठी ओळखले जाते आणि चटपाल हे त्यापैकी एक आहे. हे दुर्गम शहर श्रीनगरपासून 119 किमी अंतरावर दक्षिण काश्मीरच्या एका कोपऱ्यात आहे. शहराचे निसर्गसौंदर्य तुलना करण्यापलीकडे आहे; आजूबाजूचे पर्वत, पाइनची झाडे, पिवळी आणि पांढरी रानफुले, हिरवेगार लँडस्केप आणि स्वच्छ निळे आकाश काही चित्तथरारक विहंगम दृश्ये […]Read More

महानगर

ठाण्याच्या रिंगरूट मेट्रोला केंद्राची मंजूरी, पुणे मेट्रोचाही विस्तार

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गर्दीचा प्रचंड ताण सहन करणाऱ्या महानगरांच्या परिघावर वसलेल्या लोकसंख्येला जलद प्रवास करता यावा यासाठी देशातील अनेक महानगरामध्ये केंद्र सरकारकडून मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वांधिक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्रातील ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरला […]Read More

राजकीय

जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणूक तारखा जाहीर

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान, २५ सप्टेंबरला दुसऱ्या तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण […]Read More

मनोरंजन

७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट ‘आट्टम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित ‘वारसा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर […]Read More

ट्रेण्डिंग

मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक क्षेत्र AI ने प्रभावित झाले आहे. विविध उद्योग समूह आपल्या कामात AI चा अवलंब करून नावीन्यपूर्ण उपक्रम करू लागले आहेत. मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर ZEENIA महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. झी 24 ही वृत्तवाहिनी हा विक्रम करणार आहे. […]Read More

देश विदेश

सरकारी कामासाठी आता होणार फक्त ‘संदेस इन्स्टंट मेसेजिंग’ अ‍ॅपचा वापर

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अ‍ॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्‍यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अ‍ॅपच वापरावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन शासकीय कार्यालये स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेशांची […]Read More