mmcnews mmcnews

देश विदेश

थायलंडच्या पंतप्रधानपदी या तरुण महिला नेत्या

बँकॉक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील काही देशांमध्ये सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत असून नवीन नेते सत्तेत येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये आंदोलकांनी शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावली. त्यानंतर थायलंडमध्ये श्रेथा थाविबाहसिन यांना दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने पंतप्रधानपदावरून हटवले होते. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या वकिलाचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे पाऊल […]Read More

महानगर

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शन

ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने (१९ ऑगस्ट) ’ठाणे महानगरपालिका’ आणि ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने’,ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन उद्यापासून सुरू झाले असून सदर प्रदर्शन 20 ऑगस्ट 2024 पर्यत सुरू राहणार आहेत. या स्पर्धेतील विजेते ठरलेल्या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश देखील या प्रदर्शनात […]Read More

खान्देश

नाशिकमध्ये बंदला हिंसक वळण, शहरात कलम १४४ लागू

नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीविरोधात सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या बंदला काही दुकानदारांनी विरोध केला. त्यावेळी दुकानं बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी आंदोलकांकडून काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. याप्रसंगी वेळीच नाशिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकानं घटनास्थळी धाव […]Read More

ट्रेण्डिंग

Mpox विषाणूचा जगातील ११६ देशांमध्ये कहर, WHO ने जाहीर केली

जगावर आता एक नवं संकट आलं आहे. एमपॉक्स (Mpox) नावाच्या विषाणुचा जगातील ११६ देशांमध्ये प्रसार झाला आहे. एमपॉक्स विषाणूला आधी मंकीपॉक्स या नावानं ओळखलं जात होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. Mpox ला जागतिक आणीबाणी घोषित करण्याची 2 वर्षातील ही दुसरी वेळ आहे.जेव्हा हा रोग जागतिक स्तरावर […]Read More

देश विदेश

कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणी १७ ऑगस्टला आयएमएचा देशव्यापी संप

कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचे देशभरात पडसाद उमटले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकही धास्तावले आहेत. तसेच या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. […]Read More

राजकीय

राज ठाकरे यांच्यावर येणार बायोपिक? शूटिंगचे फोटो व्हायरल

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जीवन प्रवास लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांच्या बायोपिकच्या शूटिंगलाही सुरूवात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोशल मीडियावर या शूटिंगचे फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत अभिनेत्री तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक कलाकार, खेळाडू, राजकीय नेत्यांच्या जीवनावर […]Read More

राजकीय

विधानसभा निवडणुक वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर चिन्हावर लढवणार !

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क): आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुद्धा मागे नाही. अशातच दिनांक 14 ऑगस्ट रोजी भारतीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात ‘गॅस सिलेंडर’ चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे. […]Read More

विदर्भ

11 फुट पाण्याखाली लहरविला तिरंगा…

अमरावती दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेची भावना आणून, राष्ट्रीय ध्वज साजरे करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया सर्व भारतभर संपूर्ण उत्साहाने मिरवणुकांमध्ये सामील होतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याच्या भावनेला समर्पित लोक शर्यती आणि मॅरेथॉन,रॅली मध्ये भाग घेतात. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाचा आदर करण्यास प्रोत्साहित केले […]Read More

देश विदेश

उद्या अवकाशात झेपावणार ISRO चं ‘बेबी रॉकेट’

श्रीहरीकोटा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या इस्रोचं छोटं रॉकेट, ज्याला ‘बेबी रॉकेट’ म्हणतात, EOS-8 नावाच्या अर्थ इमेजिंग सॅटेलाइटसोबत लाँच करण्यात येणार आहे. या सोबतच SR-0 नावाचं डेमो सॅटेलाइट देखील अवकाशात नेला जाणार आहे. SR-0 म्हणजेच ‘स्पेस रिक्षा’ या नावाचा सॅटेलाईट चेन्नईमधील एका स्टार्टअपने हा सॅटेलाइट तयार केला आहे. श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून EOS-8 […]Read More

क्रीडा

पंतप्रधानांनी घेतली ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंची भेट

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. पॅरिस ऑलिम्पिकमधून परतलेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले आणि त्यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पंतप्रधान नरेंद्र […]Read More