11 फुट पाण्याखाली लहरविला तिरंगा…

 11 फुट पाण्याखाली लहरविला तिरंगा…

अमरावती दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेची भावना आणून, राष्ट्रीय ध्वज साजरे करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया सर्व भारतभर संपूर्ण उत्साहाने मिरवणुकांमध्ये सामील होतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याच्या भावनेला समर्पित लोक शर्यती आणि मॅरेथॉन,रॅली मध्ये भाग घेतात. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाचा आदर करण्यास प्रोत्साहित केले जाते.

अश्यातच अमरावती शहर पोलिस आयुक्तालयातील पोलीस अंमलदार प्रवीण आखरे यांनी स्वातत्र्यदिनाचे औचित्य साधून पोलीस जलतरण केंद्रात काल अकरा फूट पाण्याखाली. तिरंगा लहरवून स्वातंत्र्याचा उत्साह साजरा केला.

प्रवीण आखरे हे जलतरण केंद्रात पोलिस अंमलदार म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी या पाण्यावर तरंगत आणि पाण्याच्या आत राहून योगासने करून ‘इंडीया बुक ऑफ रेकाॅर्ड’ तसेच ‘एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ आपल्या नावे केला आहे.त्यांच्या या कामगिरीमुळे अमरावती शहर पोलिस विभागाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला असून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची शान वाढली आहे .प्रवीण यांनी पूर नियंत्रण तसेच शोध आणि बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण देखील वाचविले आहेत. प्रवीण आखरे यांच्या या देशभक्तीपर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ML/ML/SL

16 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *