‘मुंबई क्लीन लीग’ प्लॅटफॉर्मवर अपलोड करा कचऱ्याचे फोटो, होणार तत्काळ कारवाई

 ‘मुंबई क्लीन लीग’ प्लॅटफॉर्मवर अपलोड करा कचऱ्याचे फोटो, होणार तत्काळ कारवाई

मुंबई, दि. १२ : मुंबई स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेत मनपाने नागरिकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे महापालिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, नागरिक आता ‘मुंबई क्लीन लीग’ प्लॅटफॉर्मद्वारे कचरा साचणाऱ्या ठिकाणांची तक्रार करू शकतात. तक्रार केल्यानंतर MCGM कडून संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

या सुविधेचा वापर करण्यासाठी नागरिकांनी प्रथम ‘Mumbai Clean League’ या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. यानंतर युजर्सना नाव, पत्ता, पिनकोड आणि प्रभाग क्रमांक याची माहिती भरावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर नागरिक पोर्टलमध्ये लॉगिन करू शकतात.

लॉगिन केल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या ‘गार्बेज हॉटस्पॉट’ पर्यायावर क्लिक करून ‘रजिस्टर हॉटस्पॉट’ निवडावे लागेल. त्यानंतर नागरिकांना परिसराचे नाव, प्रभाग, जवळील महत्त्वाची जागा याबाबतची माहिती द्यावी लागेल. याशिवाय, संबंधित कचऱ्याच्या ठिकाणाचे फोटो अपलोड करण्याची आणि तक्रारीसंदर्भात अतिरिक्त माहिती लिहिण्याची सुविधाही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

हॉटस्पॉटची नोंद झाल्यानंतर संबंधित ठिकाणी बीएमसीकडून कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. मुंबईतील स्वच्छता आणि स्वच्छताविषयक व्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत वारंवार कचरा साचणारी १६२ ठिकाणे ओळखली आहेत. वारंवार स्वच्छता मोहीम राबवूनही या ठिकाणी पुन्हा कचरा साचत असल्याचे निरीक्षण आणि नागरिकांच्या तक्रारींतून समोर आले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *