जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणूक तारखा जाहीर

 जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणूक तारखा जाहीर

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान, २५ सप्टेंबरला दुसऱ्या तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 74 सर्वसाधारण, SC-7 आणि ST-9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार असतील. ज्यामध्ये 44.46 लाख पुरुष, 42.62 लाख महिला, 3.71 लाख प्रथमच मतदार आणि 20.7 लाख तरुण मतदार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 90 झाली आहे. आता जम्मूमध्ये 43 आणि काश्मीरमध्ये 47 जागा असतील. PoK साठी फक्त 24 जागा राखीव आहेत. येथे निवडणूक होऊ शकत नाही. तर लडाखमध्ये विधानसभा नाही. अशा प्रकारे एकूण 114 जागा असून त्यापैकी 90 जागांवर निवडणूक होणार आहे. जम्मू प्रदेशात सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूरमध्ये प्रत्येकी एक जागा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी काश्मीर भागातील कुपवाडा जिल्ह्यात एक जागा वाढवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान, २५ सप्टेंबरला दुसऱ्या तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, हरियाणात दोन कोटींहून अधिक मतदार आहेत. 90 पैकी 73 जागा सर्वसाधारण आहेत. हरियाणात 27 ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. हरियाणात 20 हजार 269 मतदान केंद्रे आहेत. हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार असून ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “२०२४ च्या लोकसभा निवडणुका ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. ती यशस्वीपणे आणि शांततेने पार पडली. संपूर्ण लोकशाही जगासाठी एक अतिशय मजबूत लोकशाही पृष्ठभाग निर्माण केला, ती कोणत्याही प्रकाराशिवाय शांततापूर्ण होती. संपूर्ण देशाने निवडणुकीचा सण साजरा केला आणि जगात पहिल्यांदाच सर्वाधिक मतदान झाले.

दरम्यान आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर होणे अपेक्षित होते.कारण महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर न करण्याचे कारण निवडणूक आयोगाने सांगितले. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीमुळे सुरक्षा दल त्याठिकाणी असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक त्यानंतर जाहीर करण्यात येईल. तसेच महाराष्ट्रात पाऊस, गणपती उत्सव आणि पितृपक्षामुळे महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया जम्मू-काश्मीर आणि हरियाणानंतर करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. आता महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक जम्मू-काश्मीर आणि हरियाणीची प्रक्रिया झाल्यावर जाहीर होणार आहे.

SL/ML/SL

16 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *