mmcnews mmcnews

महानगर

दहीहंडी फोडताना 63 गोविंदा जखमी

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क):दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगताना दिसणार आहे. यात पावसाने हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आज सकाळ पासून दहीहंडी फोडताना सायंकाळी 7 वाजेपर्यंत 63 गोविंदा जखमी झाले आहे .या गोविंदांना […]Read More

ट्रेण्डिंग

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांवर नव्याने गुन्हा

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ॲडव्होकेट शेखर जगताप, सेवानिवृत्त एसीपी सरदार पटेल, पीआय मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल अशी या प्रकरणातील सहआरोपींची नावे आहेत. सदर व्यक्तींवर […]Read More

गॅलरी

राजकोट किल्ल्यावर नौदलाचे पथक दाखल

सिंधुदुर्ग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी नौदल आणि सिंधुदुर्ग पोलीस यांचे पथक दाखल झाले. सिंधुदुर्ग पोलिसांची फॉरेन्सिक टीम ही राजकोटवर दाखल झाली. या अपघात प्रकरणी पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ML/ML/SL 27 August 2024Read More

शिक्षण

शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित…

चंद्रपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जळगाव येथे पदस्थापना असलेल्या चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या अनियमिततेची चौकशी झाल्यावर त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर काशीद अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून […]Read More

राजकीय

विधानसभेसाठी सुमारे ८०० मराठा उमेदवार इच्छुक

जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता पर्यंत सुमारे 700/ 800 इच्छुकांनी अर्ज उमेदवारीसाठी सादर केले आहेत अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला एक वर्ष होणार असल्याने अंतरवाली सराटीत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठा समाजाने देशातील प्रचंड मोठा लढा उभारला आणि तो यशस्वी केला […]Read More

राजकीय

खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन

नांदेड, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली दिली. मंत्री महोदयांसोबत शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य […]Read More

सांस्कृतिक

ऐंशी बाल कलाकारांकडून अयोध्येत श्रीराम चरणी सेवा सादर

अयोध्या/पुणे, ता. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील ८० बाल कलाकारांनी रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात स्व.ग.दि माडगूळकर रचित आणि सुधीर फडके स्वरबध्द केलेले गीतरामायण सादर केले. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुण्यातील “स्वरतरंग संगीत अकादमी” तर्फे बाल कलाकारांच्या गटासह होणारा तसेच अयोध्या […]Read More

महिला

महिलांनो ! प्रवासात तिकीट नसल्यास तुम्हाला टिसी नाही काढू शकत

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एखादी महिला तिकिट नसतानाही ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, तर टीटीई तिला खाली उतरण्यास सांगू शकत नाही. भारतीय रेल्वे कायदा 1989 ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना विशेष अधिकार देतो.भारतीय रेल्वे कायदा 1989 चे कलम 139 महिलांच्या अधिकारांबद्दल बोलतो.भारतीय रेल्वे कायदा 1989 च्या कलम 139 नुसार, जर एकट्याने प्रवास करत […]Read More

पर्यावरण

पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असून, गणेशमूर्तींचे काम सुरू आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडू मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती करण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. मात्र, शेकडो वर्षांपासून शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांकडे सरकारने दुर्लक्ष केले असून, कोणतेही अनुदान देण्यात अपयश आले आहे. दरम्यान, शाडू मातीच्या दरात ५० […]Read More

महानगर

मुंबईतील 15 केंद्रांवर मिळणार जर्मन भाषेचे प्रशिक्षण

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला असून मुंबईमध्ये 15 केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील […]Read More