मुंबई दि.12(एम एमसी न्यूज नेटवर्क) : खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात वीज कंपन्या देऊ नकाकोणत्याही वीज कंपन्यांचे खाजगीकरण करणार नाही असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आधुनिकरण व नुतनीकरण करण्याच्या नावाखाली खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात वीज कंपन्या देण्याच्या सरकारच्या निर्णयास कृती समितीचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आता तीव्र आंदोलन व त्यानंतर संप करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरु झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल ९ […]Read More
मुंबईतील प्रभादेवीमध्ये रस्त्यात भलामोठा खड्डा पडल्याची घटना गुरुवारी (दि. 12 सप्टेंबर) घडली आहे. हा खड्डा चक्क रस्त्याच्या मधोमध पडला आहे. या रस्त्यावरून जाताना एका चारचाकी गाडीचं चाकही खड्ड्यात अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत कोणलाही दुखापत झाली नसल्याची माहितीही समोर येत आहे. अशात आता रस्त्यांच्या कामावरून नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.Read More
मुंबई दि १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी अमेरिकेत बसून आरक्षणासंदर्भातील आपली योजना सांगितली आहे. काँग्रेस आरक्षण संपवू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे हे त्यांचे वक्तव्य निषेधार्थ असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आरक्षण रद्द करण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता फक्त 12 मिनिटांत! मुंबई कोस्टल रोडचा मोठा टप्पा लवकरच सर्वांसाठी खुला झाला आहे. या नवीन मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल आणि वाहतूक कोंडीचा त्रासही कमी होईल. मुंबईकरांना मिळणारा हा नवा रस्ता, शहराच्या गतिमान जीवनशैलीत नवा अध्याय निर्माण करेल! मुंबई कोस्टल रोड आणि […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गौरी आगमनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात ज्येष्ठागौरी पूजन केले जाते. गौरीच्या मुखवट्यांना विविध अलंकारांनी नटवले जाते . काकडीच्या पिवळ्या धम्मक फुलांची माळ गौरीला अवश्य अर्पण केली जाते. गौरीची स्थापना श्री गणेशाच्या शेजारी केली जाते. ज्याप्रमाणे गणेशाच्या आगमनानंतर कौड कौतुक केले जाते तसेच कौतुक गौरीचे देखील गोडाधोडाचा नैवेद्य दाखवूनकेले […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वक्फ संरक्षण आणि पारदर्शकता या गोंडस नावाखाली वक्फ च्या मालमत्ता पाडण्याचा आणि बळकावण्याचा प्रकार वक्फ विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे लोकसभेत सादर करून नव्याने प्रस्तावित केलेले वक्फ दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे.अशी मागणी प्रेस क्लब येथे आयोजित जमात-ए-इस्लामी हिंद या मुस्लिम संघटनेने केली आहे. प्रस्तावित विधेयकात वक्फची […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा काढला. विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाच दिवसांपासून राज्यभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ML/ML/PGB 11 sep 2024Read More
सांगली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीन या शेतीमालाचे बाजारातील दर घसरले आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची चिंता त्यामुळे वाढली आहे. सोयाबीन तेलाच्या आयातीमुळे स्थानिक बाजारातील हे दर घसरले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी गेली काही दिवस दरवाढीची अपेक्षा करीत आहेत. सोयाबीन पिकासाठी 4,800 रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे. पण खरेदी केंद्र नसल्यामुळे माल […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झारखंड कर्मचारी निवड आयोगाने झारखंड सचिवालयात स्टेनोग्राफरच्या ४५४ पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी इच्छुक असलेले उमेदवार jssc.nic.in या संकेतस्थळावर 5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेतून पदवी किंवा समकक्ष पदवी. वयोमर्यादा: 21 ते 35 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एससी, एसटी, […]Read More