mmcnews mmcnews

करिअर

येत्या वर्षात रशियामध्ये भारतीयांसाठी ७२ हजार नोकरीच्या संधी

मॉस्को, दि. 23 : रशियाने तब्बल 72,000 भारतीय कामगारांना आपल्या देशात बोलावण्याची योजना आखली आहे. यामुळे भारतीय तरुणांसाठी रशियात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नुकत्याच झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान या विषयावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. ‘मोस्कोव्स्की कोम्सोमोलेट्स’ या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रशियाने या वर्षासाठी परदेशी कामगारांचा कोटा 2,35,000 निश्चित केला […]Read More

क्रीडा

भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात दुप्पट वाढ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत महिला खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या अॅपेक्स काउन्सिलच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन संरचना तयार करणे आणि देशांतर्गत पातळीवर त्यांना अधिक […]Read More

मनोरंजन

हा ठरला२०२५ मधील सर्वांधिक कमाई करणारा चित्रपट

मुंबई, दि. २३ : रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने मोठे विक्रम मोडत आहे. प्रदर्शनाच्या 18व्या दिवशी चित्रपटाचे एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 877 कोटी झाले आहे. यासोबतच ‘धुरंधर’ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आतापर्यंत हा विक्रम ऋषभ शेट्टीच्या कन्नड चित्रपट ‘कांतारा: द लीजेंड-चॅप्टर 1’ कडे होता, ज्याचे एकूण कलेक्शन 850 कोटी रुपये […]Read More

ट्रेण्डिंग

महिलांनी कॅमेरा फोन वापरल्यास होणार कारवाई

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील चौधरी समाजाच्या सुंधामाता पट्टीच्या पंचायतीने एक विचित्र फर्मान काढले आहे. या निर्णयानुसार, परिसरातील 15 गावांमधील सुना आणि मुलींना आता कॅमेरा असलेला स्मार्टफोन वापरता येणार नाही. त्याऐवजी त्यांना जुन्या पद्धतीचा की-पॅड असलेला साधा फोन वापरावा लागेल. एवढेच नाही तर लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजारच्या घरी जातानाही सोबत मोबाईल फोन नेण्यावर बंदी घालण्यात […]Read More

कोकण

सिंधुदुर्गमध्ये उभारले जाणार ताज हॉटेल

वेंगुर्ला, दि. २३ : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित ( ५ स्टार ) हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पर्यटन नकाशावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गची ठळक ओळख निर्माण होणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

कोल्हापुर-मुंबई बसवर 1 कोटी 22 लाखांचा दरोडा

मुंबई, दि. 23 : कोल्हापुर मुंबई बसवर 1 कोटी २२ लाख रुपयांचा दरोडा पडला आहे. 60 KG चांदी दरोडेखोरांनी लुटली आहे. दरोडेखोर बसमध्ये घुसले आणि चाकूचा धका दाखवून त्यांनी हा दरोडा टाकला. कोल्हापूर ते मुंबईला जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खाजगी आराम बसवर दरोडा पडला आहे. किणी गावचे हद्दीत अनोळखी सात ते आठ अनोळखी इसमाने चाकूचा धाक […]Read More

महानगर

उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा

मुंबई, दि. 23 : मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. मालाड येथे आयोजित ‘संवाद उत्तर भारतीयों से, चर्चा मुद्दों पर’ या कार्यक्रमात जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यामध्ये एकूण सात मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, […]Read More

शिक्षण

मेघालयच्या अभ्यासक्रमात पहिलीपासून खासी आणि गारो भाषा

शिलाँग, दि. २२ : मेघालय सरकारने खासी आणि गारो भाषा इयत्ता 1 पर्यंतच्या मुलांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची घोषणा केली. या उपायाचा उद्देश मुलांची शिकण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि त्यांना राज्याच्या स्थानिक संस्कृतीशी सुरुवातीच्या टप्प्यावर जोडणे हा आहे. अनेक शाळांनी त्यांचा अभ्यासक्रम आधीच निश्चित केला आहे. अशा परिस्थितीत, नवीन पाठ्यपुस्तके आगामी शैक्षणिक सत्रात म्हणजेच 2026-27 मध्ये […]Read More

बिझनेस

स्टारलिंककडून विनामूल्य राउटर अपग्रेड सुविधा

मुंबई, दि. २२ : इलॉन मस्कची स्टारलिंक कंपनी आपल्या युजर्सना राउटर अपग्रेडची सुविधा मोफत देत आहे. स्टारलिंक कंपनीची सॅटेलाईट सेवा वापरण्यासाठी, एक किट आवश्यक आहे, ज्यामध्ये राउटरचा देखील समावेश आहे. स्टारलिंकची ही भेट सॅटेलाइट सेवा वापरणाऱ्या नव्या युजर्ससाठी नाही, तर जुन्या किंवा विद्यमान युजर्ससाठी आहे. ही ऑफर अशा ग्राहकांसाठी आहे जे बऱ्याच काळापासून स्टारलिंकची सेवा […]Read More

मराठवाडा

मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी

परभणी, दि. २२ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी येथे ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण सुरु होत आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ही संस्था, कुशल ड्रोन पायलट तयार करण्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणात वर्ग शिक्षण, सिम्युलेटरवर आधारित प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उड्डाण सत्रांचा समावेश आहे. लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स […]Read More