वाघाटी जातीचे दुर्मिळ रानमांजर केले मुक्त….
अलिबाग दि २० – रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जंगलतोड, वाढते शहरीकरण, आणि पशु पक्षांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण, बेकायदेशीरपणे केली जाणारी पशुपक्ष्यांची शिकार या सारख्यां बाबींमुळे निसर्गातील अनेक पशुपक्ष्यांच्या व वन्यजीवांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत त्यातलीच एक घटना उरण तालुक्यातील धुतूम गावाच्या हद्दीत पाहायला मिळाली.
धुतूम गावचे हद्दीत कुण्या अज्ञात इसमाने लावलेल्या फासकित ( फासात ) वाघाटी ( Rusty spotted cat) जातीची रानमांजर अडकलेल्या अवस्थेत शरद ठाकूर यांना पाहायला मिळाली. त्यांनी सामाजिक कार्यात आणि खास वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात अग्रेसर असणारी ज्या संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत अनेक प्राणी-पक्षांना, वन्यजीवांना वाचविण्याचं काम करून त्यांना त्यांच्या अधिवासात मुक्त करण्याचं काम केलं.
ही माहिती मिळताच लागलीच राजू मुंबईकर यांच्या सोबत केअर ऑफ नेचर संस्थेची टीम घटनास्थळी जावून जागेची पाहणी करून लागलीच त्या फासकी ( फासा) मधून त्या वाघाटी जातीच्या ( Rusty spotted cat) रानमांजराची अगदी सुखरूपपणे सुटका करून तिला एका लोखंडी पिंजर्यात आणून लागलीच महाराष्ट्र वनविभाग उरण वनपरिक्षेत्राचे वनपाल सुनिल महाडिक यांना कळविण्यात आले.
त्या वाघाटी जातीच्या रानमांजराला कुठलीच इजा झाली नसल्या कारणामुळे तिला मौजे वेश्वी – उरण येथील जंगलात वनगार्ड राजेंद्र करांडे यांच्या समक्ष त्यांच्या अधिवासात मुक्त संचार कारणासाठी सुखरूपपणे मुक्त करण्यात आली. अत्यंत लाजाळू आणि निशाचर असणारी प्रजाती ( Rusty spotted cat )मराठीत हीला वाघाटी म्हणतात.
जगातील आकाराने सर्वात लहान असणारी मांजर (रानमांजर) इंग्रजी नावाप्रमाणेच तीचं शरीर एखाद्या गंज लागलेल्या धातूच्या रंगाप्रमाणे असते ह्या रंगामुळेच ती आपल्या अधिवासात बेमालूमपणे मिसळून जाते. निशाचर आणि त्यात अत्यंत लाजाळू असल्यामुळे वाघाटीचे दर्शन सहजपणे होत नाही त्यामुळेच ही मांजर दुर्मिळ प्रजातीची मानली जातोय.
वाघाटी जातीच्या रानमांजराला वाचण्यासाठी उरण -धुतूम गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकूर व धुतूम गावातील ग्रामस्थ, काॅन संस्थेचे टीम यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्वांच्या प्रयत्नातून वाघाटी जातीच्या ह्या दुर्मिळ रानमांजराची सुखरूपपणे सुटका करून तीला मुक्त अधिवासात ( जंगलात ) मुक्त संचार करण्यासाठी मुक्त केल्याने ह्या सर्वांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.ML/ML/MS