mmcnews mmcnews

महानगर

पाच लाखांची लाच घेताना सीजीएसटी अधीक्षकाला अटक

मुंबई, दि. २४ : CBI ने आज नरीमन पाईंट येथील एअर इंडिया इमारत कार्यरत असलेले सीजीएसटी ऑडिट-१ चे अधीक्षक अंकित अगरवाल याला एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. सीबीआयने सांगितले की, कंपनीच्या संचालकाने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे २२ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, […]Read More

ट्रेण्डिंग

एअर प्युरिफायरवर १८% GST, न्यायालयाने सरकारला फटकारले

नवी दिल्ली, दि. २४ : दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. एअर प्युरिफायरवर १८% जीएसटी आकारला जात असल्याने नागरिकांना स्वच्छ हवा मिळत नसल्याची तक्रार न्यायालयाने नोंदवली. न्यायालयाने स्पष्ट केले की जर सरकार नागरिकांना स्वच्छ हवा देऊ शकत नसेल, तर किमान एअर प्युरिफायरवरील कर कमी करावा. दिल्ली उच्च न्यायालयाच्या द्वैतीय खंडपीठाने २४ डिसेंबर २०२५ रोजी […]Read More

ट्रेण्डिंग

चार चाकी शिकण्यासाठी सरकार देणार ५ हजार रु भत्ता

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ अंतर्गत मंडळाकडे नोंदीत झालेला कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम असणार आहेत. योजनेंतर्गत ज्या कामगारांनी आणि कामगार कुटुंबीय सदस्यांनी शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून […]Read More

देश विदेश

पाकिस्तानी एअरलाइन्सची ४८२ दशलक्ष डॉलरमध्ये विक्री

इस्लामाबाद, दि. २४ : आर्थिक संघर्षाने ग्रासलेल्या पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे खाजगीकरण (Privatization) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. इस्लामाबाद येथे झालेल्या थेट लिलावात अरिफ हबीब यांच्या नेतृत्वाखालील कन्सॉर्शियमने 75% हिस्सा विकत घेतला. या व्यवहाराची किंमत 135 अब्ज रुपये (482-485 दशलक्ष डॉलर्स) म्हणजेच सुमारे 135 अब्ज पाकिस्तानी इतकी ठरली. हा सौदा पाकिस्तानच्या आर्थिक […]Read More

क्रीडा

विराट कोहलीने मोडला तेंडुलकरचा रेकॉर्ड

बंगळुरु, दि.२४ : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आंध्रविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 16 हजार लिस्ट-ए धावांचा टप्पा सर्वात वेगाने गाठला. हा मैलाचा दगड त्याने केवळ 330 डावांत गाठला, तर तेंडुलकरला यासाठी 391 डाव लागले होते. विराट कोहलीने आज (24 डिसेंबर 2025) बेंगळुरूतील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स […]Read More

ट्रेण्डिंग

BSNL ची ख्रिसमस ऑफर

मुंबई, दि. २४ : BSNL ने ख्रिसमसच्या निमित्ताने एक खास ऑफर आणली आहे. नवीन ग्राहकांसाठी केवळ 1 रुपया देऊन संपूर्ण महिनाभर 4G सेवा उपलब्ध आहे. यात रोज 2GB हाय-स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS विनामूल्य मिळतात. तसेच, सिमकार्ड देखील विनामूल्य आहे. ही ऑफर 5 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. ही […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई-ठाण्यात Third Eye Asian Film Festival

मुंबई, दि. २४ : ’22 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’चं आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. “गेली बावीस वर्ष या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतींचे चित्रपट दाखवणं हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा […]Read More

ट्रेण्डिंग

ISRO ने प्रक्षेपित केला सर्वांत वजनदार उपग्रह

श्रीहरीकोटा, दि. २४ : ISRO ने आज हेवी-लिफ्ट लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3-M6) प्रक्षेपित केला. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून इस्रोने अमेरिकेच्या ६ हजार १०० किलो वजनाच्या ब्लूबर्ड ब्लॉक -२ या उपग्रहाचे पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय भूमीत भारतीय प्रक्षेपकाने प्रक्षेपित केलेला हा […]Read More

करिअर

BSF मध्ये 50% पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव

गृह मंत्रालयाने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठी आरक्षण 10% वरून 50% पर्यंत वाढवले ​​आहे.सरकारने ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, जनरल ड्युटी कॅडर (नॉन-गजेटेड) रिक्रूटमेंट रूल्स, 2015’ मध्ये बदल केले आहेत. यासोबतच, माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल. तर, नंतरच्या तुकड्यांना वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट दिली जाईल. अधिसूचनेनुसार, ‘BSF मध्ये […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरातील महाविद्यालयात रॅगिंग, विद्यार्थ्यांला मारहाण

सोलापुरातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. रॅगिंग सदृश घटना घडल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.महाविद्यालय प्रशासनाने याबाबत त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रसिक बनसोडे असे असून, त्याच्यावर […]Read More