mmcnews mmcnews

महानगर

भटके कुत्रे चावल्यास राज्य सरकारला द्यावी लागणार भरपाई

नवी दिल्ली, दि.14 : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत राज्य सरकारांच्या ढिल्या कारभाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. भटक्या प्राण्यांबाबतच्या नियमांची गेल्या 5 वर्षांपासून अंमलबजावणी न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.कुत्र्याने चावा घेतल्यास, एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा मुले आणि वृद्धांना इजा झाल्यास आता संबंधित राज्य सरकारला मोठी नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे न्यायालयाने […]Read More

ट्रेण्डिंग

इराणमधील भारतीयांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 14 : भारत सरकारने इराणमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करत सर्व भारतीयांना सुरक्षिततेसाठी इराणमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता भासल्यास त्वरित भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.आणीबाणीच्या काळात मदतीसाठी भारतीय दूतावासाने काही मोबाईल नंबर देखील […]Read More

ट्रेण्डिंग

Blinkit ने मागे घेतला १० मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा

मागील काही वर्षांमध्ये जिथं ऑनलाईन अॅपचा वापर फक्त लहानमोठ्या गोष्टी किंवा खाण्याचे पदार्थ मागवण्यासाठीच केला जात होता, तिथंच आता या आणि अशा अनेक अॅपच्या माध्यमातून सणावारासाठी लागणाऱ्या सजावट सामग्री, रोषणाईपासून ते अगदी शालेय अभ्यासासाठी लागणारी पट्टी- पेन्सिलसुद्धा दहाव्या मिनिटाला थेट घरपोच मिळत आहे. ब्लिंकीट, झेप्टो, इन्स्टामार्ट, झोमॅटो या आणि अशा कित्येत अॅपच्या माध्यमातून ही सुविधा […]Read More

बिझनेस

कच्छमध्ये अदानी समूह करणार 1.5 लाख कोटींची गुंतवणूकीतून

अहमदाबाद, दि. १३ : व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत’ (VGRC) समूहाचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी कच्छ प्रदेशासाठी भव्य गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक प्रामुख्याने बंदर विकास, अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केली जाणार आहे. पुढील 5 वर्षांत कच्छच्या सर्वांगीण विकासासाठी ही मोठी रक्कम खर्च केली जाईल. जगातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेल्या मुंद्रा पोर्टची क्षमता […]Read More

देश विदेश

चायनीज मांजामुळे मृत्यू झाल्यास दाखल होणार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नवी दिल्ली, दि. 13 : संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. मत्र पतंगाला असलेल्या चायनीज मांजामुळे दरवर्षी अनेक जण प्राण गमावतात. चायनीज मांजामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, बंदी असूनही जीवघेण्या घटना सातत्याने घडणे दुर्दैवी आहे आणि हे थांबवण्यासाठी कठोर कारवाई […]Read More

महानगर

मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल

मुंबई, दि. 13 : मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका १५ जानेवारी रोजी होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (एसईसी) आणि बीएमसीने नागरिकांना मतदार यादीत आपले नाव योग्यरीत्या नोंदले आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे. नाव किंवा ईपीआयसी (मतदार ओळखपत्र) क्रमांकाच्या आधारे एसईसी पोर्टल किंवा पालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तपासणी करता येणार […]Read More

महानगर

WPL चे दोन सामने होणार प्रेक्षकांशिवाय

नवी मुंबई, दि. १३ : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी तसेच १६ जानेवारी रोजी निकालाच्या दिवशी नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग (WPL) क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा निवडणूक कामात गुंतलेली असल्याने हा महत्त्वाचा निर्णय […]Read More

देश विदेश

Grok AI ला सरकारने आणले वठणीवर, शेकडो आक्षेपार्ह अकाऊंट्स डिलिट

मुंबई, दि. 13 : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने Grok AI च्या माध्यमातून प्रसारित आणि प्रसिद्ध होणाऱ्या अश्लील कंटेंटबाबत अखेर चुक कबुल केली आहे. अगोदर आडमुठेपणा करणारा हा प्लॅटफॉर्म सरकारने कायद्याचा बडगा उगारताच आता वठणीवर आला आहे. कंपनीने केंद्र सरकारला विश्वास दिला आहे की, कंपनी ही भारतीय कायद्यानुसारच काम करेल. याशिवाय कंपनीने ग्रोक प्लॅटफॉर्मवरील जवळपास […]Read More

देश विदेश

अमेरिकेने रद्द केले 1 लाख परदेशी Visa

न्यूयॉर्क, दि. १३ : वर्ष 2025 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने विक्रमी संख्येने परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. ट्रम्प प्रशासनाच्या कारवाईत तब्बल 1 लाखांहून अधिक व्हिसा रद्द झाले, जे 2024 मधील 40 हजारांच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आहेत. यात 8 हजार विद्यार्थी आणि 2,500 विशेष श्रेणीतील कामगारांचा समावेश होता. बहुतेक प्रकरणे व्यवसाय व पर्यटक व्हिसाशी संबंधित होती, […]Read More

देश विदेश

अमेरिकेच्या संसदेत ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे विधेयक सादर

वॉशिग्टन डीसी., दि. १३ : ग्रीनलँडला ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने आता कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेतील खासदार रँडी फाइन यांनी सोमवारी ‘ग्रीनलँड ॲनेक्सेशन अँड स्टेटहुड ॲक्ट’ नावाचे विधेयक सादर केले आहे. या विधेयकाचा उद्देश अमेरिकन सरकारला ग्रीनलँडला आपल्या ताब्यात घेण्याचा आणि नंतर त्याला अमेरिकेचे राज्य बनवण्यासाठी कायदेशीर अधिकार देणे हा आहे. खासदार रँडी फाइन यांनी […]Read More