mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी आरोग्य वेधशाळा

नवी दिल्ली, दि. 16 : भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने देशातील आदिवासी आरोग्य सुधारण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने भारताचे पहिले राष्ट्रीय आदिवासी आरोग्य वेधशाळा (National Tribal Health Observatory) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या वेधशाळेच्या स्थापनेसाठी ICMR, AIIMS (नवी दिल्ली व जोधपूर), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय आणि WHO यांसारख्या अग्रगण्य […]Read More

महानगर

राज्यातील महापालिका निवडणुकीत अंदाजे सरासरी पंचावन्न टक्के मतदान

मुंबई, दि. 15 : आज महाराष्ट्रातील मुंबई आणि इतर २८ महानगरपालिकांमध्ये सुमारे ५० टक्के मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजता मतदान संपल्यानंतर लगेचच बोलताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, २९ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदानाची टक्केवारी ४६-५० टक्के दरम्यान होती. मतदानाचे अचूक आकडे नंतर जाहीर केले जातील, असे एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले. निवडणुकांमध्ये २,८६९ जागांसाठी […]Read More

देश विदेश

अमेरिकेने थांबवली ७५ देशांतील नागरिकांची Visa प्रक्रीया

वॉशिग्टन डीसी, दि. १५ : अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने ७५ देशांतील नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली आहे. यामध्ये रशिया ,ब्राझील यांसारख्या देशांचा समावेश आहे. ट्रंप प्रशासनाच्या मते, या निर्णयामागे अमेरिकेत ‘पब्लिक चार्ज’ बनण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांवर लक्ष ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. या निर्बंधांची अंमलबजावणी 21 जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी लागू होणार आहे.नोव्हेंबर २०२५ मध्ये जारी केलेल्या निर्देशांनुसार, […]Read More

देश विदेश

अबुधाबीतील भारतीय कंपन्यांनी शोधले नवीन तेल साठे

अबुधाबी, दि. १५ : भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( BPCL ) यांनी अबुधाबीतील एका भूभागातील तेल उत्खनन ब्लॉकमध्ये नवीन तेलाचे साठे शोधले आहेत. UBPL मध्ये IOC आणि BPCL ची प्रत्येकी 50 टक्के भागीदारी आहे. 2024 च्या सुरुवातीला UBPL ने XN-76 या शोध विहिरीतपहिले तेल साठे शोधले होते. […]Read More

पर्यावरण

दिल्ली उभारली जाणार ५० स्वयंचलित हवामान दर्शक केंद्रे

नवी दिल्ली ,१५ जानेवारी : शहर-स्तरीय हवामान निरीक्षण मजबूत करण्यासाठी आणि रिअल-टाइम डेटा संकलन सुधारण्यासाठी, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय दिल्लीमध्ये ५० स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यावर काम करत आहेत, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी सांगितले. येथे आयएमडीच्या १५१ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला संबोधित करताना, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान […]Read More

महानगर

मुंबई विमानतळाचा रडार दहिसर येथून गोराईत हलवणार

मुंबई, दि. 15 : मुंबई विमानतळाचा उच्च-फ्रिक्वेन्सी रडार दहिसर येथून गोराई येथे हलवण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामुळे दहिसरमधील विकासकामांमध्ये येणारे अडथळे दूर होणार आहे. या निर्णयामुळे उत्तर मुंबईतील दहिसर परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, […]Read More

ट्रेण्डिंग

देशातील सर्वांत लहान वेटलिप्टर, पुण्यातल्या ६ वर्षांच्या चिमुकलीची कामगिरी

पुणे, दि. १५ : पुण्याची अवघी सहा वर्षांची मिहिरा गांगुर्डे हीने भारतातील सर्वात तरुण वेटलिफ्टर होण्याचा मान मिळवला आहे. स्वतःच्या शरीरापेक्षा अधिक वजन उचलत क्रीडा क्षेत्रात तिने नवा इतिहास रचला आहे. मिहिरा रोज नियमितपणे वॉर्मअप, रनिंग, जंपिंग आणि व्यायाम करते. मला हा खेळ खूप आवडतो. मी रोज एक्सरसाईज करते. पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे […]Read More

मराठवाडा

कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला बुटाने मारहाण

वाशिम, दि. 14 : मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात एका मुजोर कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनरेगा योजनेअंतर्गत संत्री फळबागेच्या अनुदानाबाबत विचारणा केल्याने तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन कांबळे असे मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे नाव […]Read More

ट्रेण्डिंग

तस्करीसाठी वाढला क्रिप्टोकरन्सीचा वापर – DRI चा अहवाल

नवी दिल्ली , दि. १४ : तंत्रज्ञान प्रगत होत जाते तसे गुन्हेगारही अधिक अद्ययावत राहून काम करू लागतात. असाच प्रकार आता तस्करीच्या बाबतीतही घडत आहे. Diroctaret of Revenue Intelligence ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात सोने, अमली पदार्थांच्या तस्करीसाठी cryptocurrency चा वापर अलीकडच्या वर्षांत लक्षणीयरीत्या वाढल्याचे नमूद केले आहे. यूएसडीटीसारखी स्टेबलकॉइन्स पारंपरिक हवाला नेटवर्कची जागा घेत […]Read More

अर्थ

इराणमधील अस्थिरतेमुळे भारताची बासमती निर्यात अडचणीत

नवी दिल्ली, दि. 14 : इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक अराजकतेचा थेट परिणाम भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीवर जाण्यास लागला आहे. देशांतर्गत बासमती तांदळाच्या किमतींमध्येही मोठी घसरण झाल्याचे उद्योग संघटना नमूद करत आहेत. निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार, इराणी खरेदीदारांकडून होणारे पेमेंट विलंब आणि व्यापारातील अनिश्चितता ही सध्याची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवत आहे. इंडियन राईस एक्स्पोर्टर्स फेडरेशनने काल एक निवेदन […]Read More