mmcnews mmcnews

ऍग्रो

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारसाठी 105 कोटी रु. मंजूर

“गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” या योजनेअंतर्गत 105.41 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जलसाठ्यांची क्षमता वाढवणे आणि जलसंधारणाला चालना देणे. शेतकऱ्यांना सुपीक गाळयुक्त माती उपलब्ध करून देणे. पाण्याची साठवणूक क्षमता सुधारून दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देणे. ही या उपक्रमाची मुख्य उद्दिष्ट्य आहेत. हा निधी आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग,औरंगाबाद यांच्यामार्फत जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना वितरित करण्यात […]Read More

देश विदेश

जगातील सर्वांत सुरक्षित देशांची यादी जाहीर

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 ने जगातील सर्वात सुरक्षित देशांची एक नवीन यादी जाहीर केली आहे, यामध्ये विशष बाब म्हणजे यामध्ये पाकिस्तानने भारताला मागे टाकून वरचे स्थान मिळवले आहे. नुम्बेओने जाहीर केलेल्या ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 मध्ये पाकिस्तान 65 व्या क्रमांकावर आहे तर भारत 66 व्या क्रमांकावर आहे. सुरक्षेच्या […]Read More

महानगर

निसर्ग उन्नत मार्गाला अवघ्या २ दिवसांत ३४०० पर्यटकांचा प्रतिसाद!

मुंबई दि.31(एम एमसी न्यूज नेटवर्क): मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकर नागरिकांच्या प्रचंड पसंतीला उतरला आहे. रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी लोकार्पण झाले, त्या दिवसापासूनच याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांची संख्या मोठी आहे. आज सार्वजनिक सुटीच्या निमित्ताने ऑनलाईन तिकिट नोंदणीचे सर्व स्लॉट नोंदणी पूर्ण (हाऊसफुल्ल) झाली. तसेच येत्या आठवडाभराच्या कालावधीसाठीही नागरिकांनी आगाऊ […]Read More

महानगर

महाराष्ट्र सरकारने वाहनचालक – मालकांसाठी तत्काळ निर्णय घ्यावा!

मुंबई दि.31(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील वाहनचालक आणि गाडी मालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, महामार्गांवरील सुरक्षेचा अभाव, पोलिस आणि अधिकाऱ्यांकडून होणारी जबरदस्ती, चोरी-लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ, तसेच सरकारकडून कोणतीही ठोस मदत न मिळणे यामुळे वाहनचालक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा ऑल […]Read More

गॅलरी

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस…आंब्याचे नुकसान

बीड दि ३१…मागील काही दिवसांपासून उकाडा जाणवत असून आज बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आंबा पिकाला तसेच उन्हाळी भाजीपाला पिकाचे नुकसान होणार आहे. दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.Read More

महानगर

बिल्ड इंडिया इन्फ्रा ॲवॉर्ड्समध्ये mmrda चे दोन प्रकल्प सन्मानित

मुंबई दि ३१ — मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहे. शाश्वत, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख विकासासाठी असलेली आपली कटिबद्धता दाखवताना एमएमआरडीएने नवी दिल्लीत पार पडलेल्या बिल्ड इंडिया इन्फ्रा ॲवॉर्ड्स २०२५ मध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. हे पुरस्कार महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी प्राधिकरणाचे […]Read More

राजकीय

‘वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे, यासाठी राज्य सरकार

नागपूर, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगदगुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज यांच्याद्वारे प्रणित ‘वैदिक मॅथेमॅटिक्स बेसिक टु ॲडवान्स’ आणि ‘वैदिक गणित सूत्र अरिथमॅटिक’ या 2 पुस्तकांचे प्रकाशन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले […]Read More

विज्ञान

जर्मन स्टार्टअपचं स्पेस रॉकेट लाँचिंगच्या ४० सेकंदानंतर कोसळलं

जर्मनीची स्टार्टअप कंपनी बवेरियन इसार एअरोस्पेसच्या स्पेस रॉकेटचे रविवारी (दि. 30 मार्च) लाँचिंग होते. मात्र लाँचिंगच्या 40 सेकंदानंतर ते क्रॅश झाले आहे. या लाँचिंगचा उद्देश युरोपात सॅटेलाईट लाँचिंग प्रोग्रॅमला पुढे नेण्याचा होता. मात्र, लाँचिंगनंतर ही दुर्घटना घडली. आता या क्रॅशचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.Read More

देश विदेश

हिमाचल प्रदेशमधील मणिकर्णमध्ये भूस्स्खलन

हिमाचल प्रदेशातील कुलूमधील मणिकर्णमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या कट्ट्यावर काही नागरिक बसलेले असतानाच दरड कोसळल्याची घटना सोमवारी ३१ मार्चला घडली. दरडीमुळे डोंगर उतारावरील मोठे वृक्ष उन्मळून घरंगळत खाली आले. त्यामुळे नागरिक व पर्यटक त्याखाली दबले गेले होते. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Read More

राजकीय

तामिळनाडू वर भाजप लक्ष केंद्रित करणार

नवी दिल्ली, दि. 31 – तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एआयएडीएमके आणि भाजपने युतीसाठी औपचारिक चर्चा सुरू केली आहे. एआयएडीएमके नेते एडाप्पाडी के पलानीस्वामी अर्थात ईपीएस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमधील ही पहिलीच औपचारिक चर्चा होती. या बैठकीपूर्वी दोन्ही […]Read More