राणीच्या बागेत होणार रॉयल बंगाल वाघाचे आगमन

 राणीच्या बागेत होणार रॉयल बंगाल वाघाचे आगमन

मुंबई, दि. ४ : राणीच्या बागेच्या प्राणीवैभवात आता बंगालच्या रॉयल वाघाचा समावेश होणार आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाने भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान वनस्पती व प्राणीसंग्रहालयास वाघाची जोडी देण्याची तयारी दर्शवली आहे.

गोरेवाडा प्राधिकरणाकडून राणी बागेला रॉयल बंगाल टायगरची जोडी देण्यासाठी केंद्रीय प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला असून लवकरच केंद्रीय प्राधिकरणाची मंजुरी मिळेल, असा विश्वास राणी बाग प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून सिंहांची जोडी आणण्यासाठी महापौर ऋतु तावडे प्रयत्नशील असून त्या स्वतः गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाला भेट देणार आहेत. तर दुसरीकडे नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाने रॉयल बंगाल टायगरची जोडी भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान वनस्पती व प्राणीसंग्रहालयात देण्यास होकार दिला आहे. याबाबत केंद्रीय प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला असून मंजुरी मिळताच लवकरच राणी बागेत रॉयल बंगाल टायगरची जोडी पर्यटकांच्या भेटीला येईल, असा विश्वास राणी बाग प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातून १२ फेब्रुवारी २०२० ला भायखळा राणी बागेत ‘शक्ती’ (नर), ‘कृष्णा’ (मादी) ही रॉयल बंगाल वाघाची जोडी देण्यात-घेण्यात तत्त्वावर आणली होती. तेव्हापासून ही जोडी मुख्य आकर्षण ठरली होती.

उद्यानात येणारे पर्यटक ‘शक्ती’ व ‘कृष्णा’ला पाहण्यासाठी गर्दी करत असतात. ‘कृष्णा’ वाघिणीने ४ नोव्हेंबर २०२२ ला दोन स्वाभाविक नर बछड्यांना जन्म दिला. यांची नावे ‘जय’ आणि ‘रुद्र’ अशी ठेवण्यात आली. आजारपणामुळे २०२४ मध्ये ‘रुद्र’चा मृत्यू झाला. २०२५ मध्ये ‘शक्ती’ वाघाचाही मृत्यू झाला.

आता ‘कृष्णा’ आणि ‘जय’ हे नर-मादी वाघ राणी बागेत आहेत. या दोन्ही वाघांना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. आता त्यांच्या जोडीला आणखी नर-मादी वाघांची जोडी आणण्यासाठी राणी बाग प्राणीसंग्रहालय प्रयत्न करत आहे.

नागपूरमधील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी होकार दर्शविला आहे. त्यानंतर गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाने तत्त्वत: यू अॅथॉरिटीकडे प्रस्ताव पाठवला असून त्यांच्याकडून मंजुरी मिळताच गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाकडून राणी बागेला वाघांची जोडी दिली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार पक्षी किंवा प्राणी राणी बाग प्राणीसंग्रहालयाकडून गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाला देण्यात येणार आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *