धारावी येथील हास्य दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि ४
जागतिक हास्यदिनानिमित फेस्कॉम संलग्न हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी व झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावी बीट दोन यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य योगा प्रशिक्षक श्री मयूर कांबळे यांच्या मार्गदर्शनाने विभागातील लोकांकरिता शिवराज उद्यान, धारावी या ठिकाणी हास्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. हास्य दिनाची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने करण्यात आली एका मागून एक असे अनेक हास्यविनोद टाळ्यांचा गजर आवाज यांचे सूर कसरतीतून हास्य विनोदाचे फटकारे पार करत लोकांना सामावून घेऊन नियमित हसण्याचे फायदे तणाव मुक्ती जीवन सकारात्मक भावना व नियमित हलका व्यायाम याबद्दल प्रचार व प्रसार करण्यात आला या उद्यानात नियमित फेरफटका व्यायाम व खेळण्याकरिता येणारी मंडळी नकळत या हास्य दिनात सहभागी झाली रोज हसा व हसवा असल्याने तणाव कमी होतो हलक्या व्यायामाने शरीर सुदृढ राहतं हसायला पैसे लागत नाही त्यामुळे तणामुक्त जीवन जगणे सोपे होते याची माहिती देऊन घोषणा दिल्या व शपथ घेतली आम्ही रोज हसणार व इतराना हसवणार. यावेळी फेस्कॉम संलग्न हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी प्रमुख मार्गदर्शक दिलीप गाडेकर,धारावी झोपडपट्टी पंचायत बीट दोन सविता शेरखाने, संदीप ढवळे, गार्डन सुपरवायझर अभिजीत चौकेकर, मास्टर मयूर कांबळे उपस्थित होते. या कामी जी उत्तर उद्यान विभागाचे व घनकचरा विभागाचे तांबे यांचे सहकार्य लाभले उद्यान्यातील स्वच्छता केल्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.त्याबद्दल त्यांचे आभार कार्यक्रमाचे शेवटी मयूर कांबळे यांच्या जन्मदिवस याच ठिकाणी साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व लोकांना चॉकलेट बिस्कीट वाटप करण्यात आले. या सर्वांचे आभार समाजसेवक दिलीप गाडेकर यांनी मानले.KK/ML/MS