जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेने ज्येष्ठ नागरिकांना केले अन्न धान्य किटचे वाटप

 जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेने ज्येष्ठ नागरिकांना केले अन्न धान्य किटचे वाटप

भिवंडी,दि ४
मौजे भिनार येथील भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन)महादेव आंबो घाटाळ यांच्या भिनार येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा, गाणे, कांबे, दह्याळेपाडा काटई कवाड कासपाडा येथील २०० ज्येष्ठ नागरिकांना व विधवा निराधार महिलांना नुकताच मोफत धान्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक भिवंडी ग्रामीण शिवसेना विधानसभा प्रमुख, आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित (ठाणे) अध्यक्ष तथा अध्यक्ष जनकल्याण सामाजिक संस्था (ठाणे) महादेव आंबो घाटाळ, श्रमिक मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष मंदार घाणेकर, भिनार ग्राम पंचायत सरपंच भरत घाटाळ, चिंबीपाडा ग्राम पंचायत सदस्य शोभा जाधव,सुरेश जाधव अनिल वाघात,नंदाकर लांगे, आदिम आधार आदिवासी पतसंस्था मर्यादित (ठाणे) व्यवस्थापक सूरज मानकर,मोनाली घाटाल, अनिल जाधव, विकी जाधव इत्यादी उपस्थीत होते. भिवंडी तालुक्यातील २०० लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *