हिमाचल प्रदेशमधील मणिकर्णमध्ये भूस्स्खलन

हिमाचल प्रदेशातील कुलूमधील मणिकर्णमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या कट्ट्यावर काही नागरिक बसलेले असतानाच दरड कोसळल्याची घटना सोमवारी ३१ मार्चला घडली. दरडीमुळे डोंगर उतारावरील मोठे वृक्ष उन्मळून घरंगळत खाली आले. त्यामुळे नागरिक व पर्यटक त्याखाली दबले गेले होते. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.