mmcnews mmcnews

ऍग्रो

दोन आठवडे आधीच मान्सून केरळमध्ये धडकणार

मुंबई, दि-7कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी अंदमान- निकोबार बेटांवरून आनंदाची बातमी आली आहे.यंदा वेळेच्या आधीच मान्सून दाखल होणार आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये १ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर मुंबईमध्ये मान्सूनच्या सरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसळण्याची शक्यता आहे.*यंदा देशात १०५ % […]Read More

देश विदेश

भारताकडून पाकिस्तानवर‌ Air Strike, ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली, दि. ७ : भारताने काल रात्री १.३० वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-ऑक्युपाइड काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले आहेत. हा हल्ला २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला आहे.बहावलपूर, मुरीदके, गुलपुर, भींबर, चक अमरू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद अशा ९ ठिकाणांवर हल्ला […]Read More

देश विदेश

पाकीस्तान विरोधात भारताकडून NOTAM जारी

पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर आता भारताने पाकीस्तानचा पुरता बिमोड करण्यासाठी कठोर पावले उटलण्यास सुरुवात केली आहे. उद्या भारताकडून पाकिस्तानी सीमेजवळ हवाई अभ्यास केला जाणार आहे. यासंदर्भातील NOTAM (नोटिस टू एअरमन) जारी करण्यात आलं आहे. भारत ७ आणि ८ मे रोजी पाकिस्तानी सीमेलगत हवाई अभ्यास करेल. याबद्दलचं नोटिस टू एअरमन केंद्राकडून जारी करण्यात आलेलं आहे. हवाई अभ्यासात […]Read More

अर्थ

७.२५ कोटींच्या पुस्तकांच्या ऑर्डरमुळे युनियन बँक आली अडचणीत

युनियन बँक ऑफ इंडियाने ₹७.२५ कोटींची पुस्तक खरेदी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात बँकेने कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम यांच्या India@100: Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse या पुस्तकाच्या जवळपास दोन लाख प्रती खरेदी केल्या आहेत. बँकेच्या १८ झोनल ऑफिसेसना या पुस्तकांचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते, जे ग्राहक, कॉर्पोरेट्स, शाळा, कॉलेज आणि ग्रंथालयांसाठी वापरण्यात […]Read More

आरोग्य

राज्यातील ईएसआय दवाखाने व हॉस्पिटलमध्ये सुधारणा करा

मुंबई, दि.6राज्यातील ईएसआय मार्फत चालविण्यात येणारे दवाखाने व हॉस्पिटलची अत्यंत दुरावस्था आहे. इमारती, वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर, परिचारिका यांचा अभाव, यामुळे कामगार व कुटुंबियांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळत नाहीत. कामगार व मालक ईएसआयला दरवर्षी 2700 कोटी रुपयांचा योगदान करत असूनही फक्त 700 कोटी रुपये राज्याला दिले जातात. त्यामुळे हॉस्पिटलची अत्यंत दुरावस्था आहे. या संदर्भात कामगार कर्मचारी संघटना […]Read More

राजकीय

100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्र्यांची

अहिल्यानगर, दि. ६ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला.त्यांनी आज मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर या दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याबाबत सूतोवाच केले. त्याचा तपशील उद्या जाहीर करण्यात येणार आहे.त्यांनी सांगितले की, शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक […]Read More

देश विदेश

परदेशी चित्रपटांवर ट्रम्प आकारणार १००% कर

अमेरिकन चित्रपट उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. सर्वप्रथम अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अनेक देशांवर आयात शुल्क लादले. आता त्यांनी चित्रपटांवरही कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेबाहेर बनवलेल्या सर्व चित्रपटांवर 100 टक्के कर लादण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले असल्याची घोषणा केली. देशांतर्गत सिनेमा निर्मितीसाठी टॅरिफमध्ये वाढ करण्यात आल्याचा दावा करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात आढळला आशियातील सर्वांत मोठा वाघ

उत्तराखंडातील फॅटो पर्यटन क्षेत्रात सध्या एक भलामोठा वाघ विलक्षण आकर्षण बनले आहे. जिम कॉर्बेट जंगलात आशियातील सर्वात मोठा वाघ पाहायला मिळाला आहे. या वाघला ‘हरक्यूलिस’ (Hercules) हे नाव देण्यात आले आहे. सुमारे 300 किलोग्रॅम वजन आणि 7 फूट लांबीचा हा महाकाय वाघ वन्यजीव प्रेमींमध्ये आणि स्थानिकांमध्ये प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे. अनेकांचा असा विश्वास आहे […]Read More

राजकीय

अहिल्यानगर मध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय

अहिल्यानगर दि ६ —जिल्ह्यामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक […]Read More

राजकीय

राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी

अहिल्यानगर दि ६– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून राज्यातील विविध सात तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.या तीर्थस्थळांमध्ये चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : 681.32 कोटी, […]Read More