mmcnews mmcnews

देश विदेश

पाकिस्तानच्या बारा शहरात चौदा बॉम्बस्फोट

भारतीय सैन्यानं 6 मेला मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर आता पाकिस्तानात स्फोटांची मालिका सुरु झाली. कराची, रावळपिंडी, लाहोर, गुजरावालासह अनेक शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात घबराट आहे. कराची सकाळच्या सुमारास स्फोट झाले. त्यानंतर आता अन्य शहरांमध्ये स्फोटांची मालिका सुरु झाली आहे. लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात चार जण जखमी […]Read More

मराठवाडा

भोजनातून विषबाधा; ५० जण रुग्णालयात दाखल

बीड दि ८…अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी (घाट) गावात नगर भोजनाच्या कार्यक्रमानंतर सुमारे ५० जणांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री गावात नगर भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर ग्रामस्थांना घेऊन सरपंच काशिनाथ कातकडे यांनी […]Read More

खान्देश

अवकाळी पावसामुळेजळगावात ७ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका

जळगाव दि ८– जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला असून यात शेतकऱ्यांचे, पशुपालक आणि अनेक गावामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे महावितरणाचे विजेचे खांब पडून अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला असून प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामाचे आदेश प्रशासनाला […]Read More

देश विदेश

या भारतीय उत्पादनावर चीनने लावला 166% कर

नवी दिल्ली, दि. ८ : चीनने भारतातून आयात होणाऱ्या साइपरमेथ्रीन या कीटकनाशकावर 48.4% ते 166.2% अँटी-डम्पिंग शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. हा शुल्क 7 मे 2025 पासून लागू होणार असून पाच वर्षांसाठी अस्तित्वात राहील. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कंपन्यांनी आपले उत्पादन अतिशय कमी किमतीत चीनमध्ये निर्यात केले, ज्यामुळे स्थानिक उद्योगांना नुकसान होत असल्याचे […]Read More

ट्रेण्डिंग

या प्रसिद्ध खेळाडूने जाहीर केली Test क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांने आज अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितने ही घोषणा केली, रोहित शर्माने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना लिहिले आहे की, “कसोटी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचा मला अभिमान आहे. पण आता पुढील पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे.” […]Read More

देश विदेश

‘ऑपरेशन सिंदूर’वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष प्रतिक्रिया

“भारतीय सैन्याने अचूकपणा, सतर्कता आणि माणुसकी दाखवली आहे. यामुळे मी आपल्या भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि सैनिकांना देशाच्यावतीने धन्यवाद देतो. सैन्याला संपूर्ण अधिकार प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानतो. आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शांचं पालन केलं आहे, जे त्यांनी अशोकवाटीका उद्ध्वस्त करताना दाखवलं होतं. आम्ही केवळ त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या निष्पापांचा जीव घेतला […]Read More

देश विदेश

नरेंद्र मोदी स्टेडीयम बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अहमदाबाद, दि. ७ : गुजरात क्रिकेट असोसिएशनला पाकिस्तानमधून ईमेलद्वारे धमकी मिळाली आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमुळे अहमदाबाद पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली आणि बॉम्ब निकामी पथकाने स्टेडियमची तपासणी केली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १४ आणि १८ मे रोजी आयपीएलचे सामने होणार आहेत, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत मोठे […]Read More

पर्यावरण

मुंबईत आढळले मान्सुनचे संकेत देणारे वैशिष्ट्यपूर्ण समुद्रीजीव

मुंबई, दि. ७ : आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अंदमानात लवकरच मान्सून धडकणार असल्याचेही काल IMD ने जाहीर केले. त्यानंतर आता मान्सूनच्या आगमनाचे संकेत देणारा एक निसर्ग अविष्कार मुंबईत दिसून आला आहे. मुंबईतील जूहू समुद्रकिनाऱ्यावर ब्लू बॉटल जेलीफिश पाहायला मिळाले. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ब्लू बॉटल जेलीफिश आले होते. वर्षातून एकदाच […]Read More

आरोग्य

आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणीकर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

मुंबई- 7 मे राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्यअध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.भर पावसात झालेल्या आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. राज्यातील सर्व […]Read More

राजकीय

सिंदूर यशस्वी मोहिमेबाबत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई, 7 मे केंद्र सरकारने पाकिस्तानवर केलेल्या सिंदूर यशस्वी मोहिमेबाबत शिवसैनिकांनि मंत्रालय येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी जल्लोष करण्यात आला. यावेळी महिलांनी हमसे जो टकराएगा मिट्टी मे मिल जायेगा, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या निरप्रयात नागरिकांना मारणाऱ्या आदर्शवादी ना धडा शिकवणार […]Read More