mmcnews mmcnews

शिक्षण

NCERT पुस्तकात ‘मराठा साम्राज्या’ वर स्वतंत्र पाठ

नवी दिल्ली, दि. 19 : आजवर मराठा साम्राज्याच्या इतिहासाला एखाद-दुसऱ्या परिच्छेदात संपवून टाकणाऱ्या NCERT ने आता आपल्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासावर एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केले आहे. इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार तिसरा धडा ‘मराठा साम्राज्याचा उदय’ या विषयावर आधारित असणार आहे. या धड्यात मराठा साम्राज्याची […]Read More

विज्ञान

गगनयानाच्या ड्रोग पॅराशूटची पात्रता चाचणी यशस्वी

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानसाठी ड्रोग पॅराशूटची पात्रता स्तरावरील लोड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ही चाचणी काल (दि. 18 ) चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) च्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेड (RTRS) सुविधेत करण्यात आली. ही डायनॅमिक चाचणी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या विशेष हाय-स्पीड एरोडायनामिक आणि बॅलिस्टिक मूल्यांकन सुविधा RTRS […]Read More

ट्रेण्डिंग

मृत व्यक्तीचा मोबाइल नंबर, सोशल मीडिया अकाऊंट्स वापरल्यास होणार कडक

मुंबई, दि. 18 : काही जण मृत नातेवाईकांचा सोशल मीडिया अकाऊंटसुद्धा स्वत: चालू ठेवतात, त्यात अपडेट्स टाकत असता. परंतु कायदेशीरदृष्ट्या हे अत्यंत चुकीचं आहे. यासाठी तुम्हाला 3 ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडात्मक शिक्षा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मोबाइल नंबर, व्हॉट्सअॅप अकाऊंट, ईमेल अॅड्रेस, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्रोफाइल्स वापरणं बेकायदेशीर आहे. […]Read More

ऍग्रो

नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात

नाशिक, दि. 18 : जिल्ह्यातील द्राक्षबागांवर नैसर्गिक वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात ढगाळ वातावरण असून सकाळी थंडी आणि ढगाळ हवेच्या कारणामुळे दुपारी उन्हाचा तडाखा बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे द्राक्षांवर थेट परिणाम होऊन त्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही प्रभावित होत आहेत. शेतकऱ्यांच्या मते, गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या […]Read More

ट्रेण्डिंग

कोस्टल रोडवरील गाण्यामुळे रहिवासी त्रस्त

मुंबई,दि. १८ : मोठा गाजावाजा करून गेल्या आठवड्यात मुंबई कोस्टल रोडवर अत्याधुनिक परदेशी तंत्र वापरून ‘जय हो’ या गाण्याचा ट्रॅक सुरू करण्यात आला. ताशी 70 किमी वेगाने या रस्त्यावरून वाहन नेल्यास ‘जय हो’ ची धून ऐकू येण्याचे कुतूहल लगेचच ओसलले आहे. कारण या सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. ब्रीच कँडीच्या रहिवाशांकडून या […]Read More

मनोरंजन

अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम

मुंबई, दि. १८ : अभिनय कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण करत असतानाच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने एक जागतीक विक्रम केला आहे. प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसाद म्हणतोय की, ‘१३ मे २०२२ यादिवशी धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा किती यशस्वी झाला हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या […]Read More

ट्रेण्डिंग

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार e-vitaraलाँच

मुंबई, दि. १८ : Maruti Suzuki ने आपली पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ई-विटारा 49kWh आणि 61kWh च्या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह आली आहे. कंपनीचा दावा आहे की, कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 543 किलोमीटरपेक्षा जास्त धावते. इलेक्ट्रिक SUV मध्ये 360 डिग्री कॅमेरा, एअरबॅग आणि लेव्हल-2 ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टिम (ADAS) […]Read More

राजकीय

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक

मुंबई, दि. १८ : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या १० राज्यांमधील ३७ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच […]Read More

ट्रेण्डिंग

कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकमांवर येतोय बायोपिक, हा अभिनेता मुख्य भूमिकेत

मुंबई, दि. १७ : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक येत आहे. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता राजकुमार राव यात मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतीच अभिनेता राजकुमार रावने बोलती खिडकियाँ शॉर्ट फिल्म महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी राजकुमारच्या बदलत्या लूकने सर्वांनाच हैराण केले. यावेळी अभिनेत्याने त्याच्या दोन बायोपिकबद्दल महत्त्वाचा खुलासा केला. राजकुमार रावने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावरील […]Read More

ऍग्रो

खान्देशातील जिनिंग व्यवसाय मोठ्या अडचणीत

जळगाव, दि. १७ : यंदा खान्देशात कापसाचे उत्पादन घटले असले, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल 7200 ते 7400 रुपये दर मिळत आहे. Cotton Corporation of India (CCI) चा हमीभाव 8100 रुपये असला तरी जाचक अटी आणि ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणींमुळे अपेक्षित प्रमाणात खरेदी झालेली नाही. परिणामी कापूस खरेदी ठप्प झाली असून जिनिंग […]Read More