खान्देशातील जिनिंग व्यवसाय मोठ्या अडचणीत
जळगाव, दि. १७ : यंदा खान्देशात कापसाचे उत्पादन घटले असले, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल 7200 ते 7400 रुपये दर मिळत आहे. Cotton Corporation of India (CCI) चा हमीभाव 8100 रुपये असला तरी जाचक अटी आणि ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणींमुळे अपेक्षित प्रमाणात खरेदी झालेली नाही. परिणामी कापूस खरेदी ठप्प झाली असून जिनिंग उद्योगातील उलाढाल मोठ्या प्रमाणात घसरली आहे.
भारताचा मोठा आयातदार देश असलेल्या बांगलादेशाने अमेरिकेसोबत नव्या व्यापार करारावर स्वाक्षरी केल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत. खान्देशातील एकूण 150 जिनिंग कारखान्यांपैकी केवळ 50 सुरू असून तेही अर्ध्या क्षमतेने चालू आहेत. यामुळे सुमारे तीन ते चार हजार मजुरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे
अमेरिका-बांगलादेश व्यापार करारानुसार बांगलादेशात तयार होणाऱ्या वस्त्रांवर अमेरिकेत शून्य टक्के आयातशुल्क लागू होणार आहे. मात्र भारतातून जाणाऱ्या उत्पादनांवर 18 टक्के कर कायम राहणार आहे.
यामुळे बांगलादेश भविष्यात अमेरिकन कापसाला प्राधान्य देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचा प्रमुख कापूस खरेदीदार देश असलेल्या बांगलादेशाकडून मागणी घटल्यास त्याचा थेट परिणाम खान्देशातील जिनिंग उद्योगावर होत आहे.
SL/ML/SL