mmcnews mmcnews

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेची याचिका

नवी दिल्ली, दि. १६ : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक गुंड अबू सालेम याला सर्वोच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले आहे. आपली २५ वर्षांची कारावासाची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा करत सालेमने सुटकेसाठी केलेली याचिका न्यायालयाने पूर्णतः फेटाळून लावली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिक्षेच्या सवलतीवरून सालेमच्या वकिलांना चांगलेच फैलावर घेतले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ […]Read More

महानगर

मुंबईच्या मुष्टीयोद्ध्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सुवर्ण’ भरारी

◆ मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे पार पडलेल्या ‘५व्या इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग कप २०२६’ मध्ये मुंबईच्या संघाने आपला दबदबा निर्माण करत जगज्जेत्यांना धूळ चारली आहे. पोलंड, कझाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त यांसारख्या बलाढ्य देशांच्या खेळाडूंना कडवी झुंज देत मुंबईच्या मुष्टीयोद्ध्यांनी एकूण ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची लयलूट केली […]Read More

राजकीय

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वादग्रस्त विधान – टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी

मुंबई, दि. १४ : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. […]Read More

महानगर

मुंबईत लवकरच सुरू होणार जल मेट्रो सेवा

मुंबई, दि. १४ : मुंबई महानगरात “जल मेट्रो प्रकल्प” सुरू करण्यासाठी मे. कोची मेट्रो लि. ने तयार केलेल्या फिजीबिलीटी अहवालानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मे. कोची रेल लि. यांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था प्रस्तावित जलवाहतुकीच्या दृष्टीने, वाहतूक अभ्यास, पायुभूत सुविधा, नौकानयनविषयक बाबी, कनेक्टिव्हिटी, जलयान, जलवाहतुकीचे […]Read More

देश विदेश

या देशात व्हॉट्सॲपवर बंदी, वापरावे लागेल स्वदेशी ॲप

मुंबई, दि. १४ : रशियाने संपूर्ण देशात मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. रशियन सरकारने सांगितले की, व्हॉट्सअॅपने रशियन कायदे आणि नियमांचे पालन केले नाही, त्यामुळे ते बंद करण्यात आले आहे. रशियाने सामान्य लोकांना स्थानिक ॲप ‘मॅक्स’ वर स्विच करण्यास सांगितले. रशियामध्ये विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर आधीपासूनच ‘मॅक्स’ इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. काही देशांमध्ये व्हॉट्सअॅप पूर्णपणे […]Read More

पर्यावरण

भटक्या कुत्र्यांना मिळणार मुंबईबाहेर निवारा

मुंबई, दि. १४ : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणासाठी पालिकेकडून विविध उपाय योजले जात आहेत. तरीही स्थानिक पातळीवर त्यांचे नियंत्रण करणे कठीण जात असल्याने आता पालिकेने या भटक्या कुत्र्यांना मुंबई बाहेर हलवण्याचे ठरवले आहे. भटक्या कुत्र्यांना ही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना निवारा मिळावा, त्या कुत्र्यांची देखभाल करावी, जेणे करुन भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणे […]Read More

राजकीय

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही – मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

मुंबई, दि. 14 : अमेरिकेशी झालेल्या महत्त्वाच्या व्यापार करारानंतर आता भारतीय बाजारपेठ अमेरिकन मालासाठी खुली झाली आहे. परिणामी देशातील शेतकरी वर्गाच्या मनात चिंता निर्माण झाली असून यामुळे देशी शेतमालाला भाव मिळणार नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांना आश्वस्त केले. फडणवीस म्हणाले की, राज्यात सोयाबीनला […]Read More

राजकीय

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा, दहा कामांची

नवी दिल्ली दि. १४ – ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. राज्यात मागील काही […]Read More

खान्देश

साईभक्ताने केला साठ ग्रॅमचा हार साईबाबांना अर्पण

अहिल्यानगर दि १४ : बीड जिल्ह्यातील कोठारबन येथील साईभक्त धनराज रावसाहेब मुंडे यांनी आज ५९ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्‍याचा हार शिर्डी येथील श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपूर्द केला. या सुवर्ण हाराची किंमत ०८ लाख ४२ हजार ५२० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला […]Read More

ट्रेण्डिंग

मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान रस्ते काँक्रिटीकरण

मुंबई प्रतिनिधी,दि. १४ : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत, मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान नेपियन सी रस्ता या महत्त्वपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ७७० मीटर लांब व २७.४५ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाले आहे. काँक्रिटीकरण कामाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी […]Read More