mmcnews mmcnews

शिक्षण

७८ वर्षीय आजींची कमाल, सुवर्णपदकासह पूर्ण केले MA मराठी

इंदूर, दि. १७ : मनापासून शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर वयाचा अडथळा येत नाही. हे इंदुर येथील ७८ वर्षीय आजींनी सिद्ध केले आहे. येथील सुषमा मोघे यांनी उतारवयात शैक्षणिक प्रवास सुरू केला आणि देवी अहिल्या विद्यापीठाच्या मराठी भाषेतील एम.ए. अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. निवृत्तीनंतर आयुष्य कारणी लावताना त्यांनी हे यश मिळवले आगे. मंगळवारी मध्य प्रदेशचे राज्यपाल […]Read More

देश विदेश

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा

मुंबई, दि. १७ : बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा नवा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली. फ्रान्स प्रजासत्ताकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात लोकभवन […]Read More

ट्रेण्डिंग

९० वर्षीय वृद्धासाठी न्यायाधीशांनी न्यायालयाबाहेरच केले न्यायदान

पाटणा,दि. १७ : बिहारची राजधानी पाटणा येथे एका ९० वर्षीय शारीरिकदृष्ट्या असक्षम वृद्धाला न्याय देण्यासाठी सीबीआयचे विशेष न्यायाधीश चक्क स्वतः त्यांच्या कारपर्यंत चालत गेले आणि न्यायाची प्रक्रिया पूर्ण केली. न्यायाधीश अविनाश कुमार यांच्या या संवेदनशील कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित ९० वर्षीय वृद्ध एका खटल्याच्या सुनावणीसाठी पाटणा येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत आपल्या कारने पोहोचले […]Read More

देश विदेश

तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान

ढाका, दि. १७ : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अध्यक्ष तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान झाले आहेत. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी संसद भवनात तारिक यांना पदाची शपथ दिली. भारताचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील या समारंभात उपस्थित होते. तारिक रहमान पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज दुपारी बीएनपीच्या खासदारांनी त्यांना संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवडले. […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये महिलांना रात्रपाळीत कामाची परवानगी देणारे विधेयक मंजूर

गांधीनगर, दि. १७ : नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, गुजरात विधानसभेने आज दैनंदिन कामकाजाचे तास वाढवून महिलांना दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देणारे दुरुस्ती विधेयक मंजूर केले. गुजरात दुकाने आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्तींचे नियमन) (सुधारणा) विधेयक, २०२६, गेल्या वर्षी सभागृहाचे अधिवेशन सुरू नसताना जारी केलेल्या […]Read More

देश विदेश

कोणाचीही वैयक्तिक माहिती लीक करणे हा ठरेल गुन्हा

मुंबई, दि. १६ : आजच्या डिजिटल युगात व्यक्तीची वैयक्तिक माहिती ही सर्वात महत्त्वाची संपत्ती मानली जाते. मोबाईल नंबर, आधार कार्ड, बँक खाते तपशील, वैद्यकीय नोंदी किंवा सोशल मीडिया डेटा यांचा गैरवापर होणे म्हणजे थेट व्यक्तीच्या गोपनीयतेवर आघात होणे. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती परवानगीशिवाय लीक करणे हा गंभीर गुन्हा ठरतो. भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम […]Read More

शिक्षण

शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देणाऱ्या प्रमाणपत्रांना स्थगिती

मुंबई, दि. 16 : एरव्ही महिनोमहिने फाईल्स धुळखात ठेवणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अगदी ताबडतोबीने ७५ फाईल्स तत्काळ हातावेगळ्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय दुखवटा जाहीर झाल्याच्या काळात अल्पसंख्याक खात्याशी संबंधित राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना फायलींवर सह्या करून अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे समोर […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात आदिवासींनी उभारली कंपनी

चेन्नई, दि. १६ : तामिळनाडूतील निलगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या १०० हून अधिक आदिवासी गावांनी एकत्र येऊन आदिमलाई ही कंपनी स्थापन केली आहे. कंपनीने महिलांच्या सहभागावर विशेष लक्ष दिले आहे. कंपनीच्या 60 कर्मचाऱ्यांपैकी 52 महिला आहेत. ही कंपनी नीलगिरीतील अनेक गावांना जोडून काम करत आहे. यात एकूण 1,809 भागधारक आहेत. यापैकी बहुतेक ग्रामीण आणि आदिवासी समुदायातील आहेत, […]Read More

पर्यटन

काश्मीरमधील १४ पर्यटनस्थळे पुन्हा खुली

श्रीनगर, दि. १६ : पहलगाम हल्ल्यानंतर बंद झालेली काश्मीरमधील पर्यटन स्थळे आता पुन्हा उघडण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित प्रदेशातील बंद असलेली 14 पर्यटन स्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा केली. लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की, संपूर्ण सुरक्षा आढावा आणि चर्चेनंतर मी काश्मीर आणि जम्मू विभागातील आणखी पर्यटन स्थळे पुन्हा उघडण्याचे आदेश दिले आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात सुरू होतय पहिलं AI विद्यापीठ

अमरावती, दि. १६ : आंध्र प्रदेश सरकारने देशातील पहिले AI विद्यापीठ उभारण्याचे ठरवले आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे १९ फेब्रुवारीला ‘AI’ विद्यापीठाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आंध्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान सचिव भास्कर कटमनेनी यांच्या मते, हे विद्यापीठ आयआयटी आणि आयआयआयटी यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. […]Read More