mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द

मुंबई, दि. १६ : कॅडबरी डेअरी मिल्कने मराठी शब्द रुजवण्यासाठी खास उपक्रम सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रसिद्ध चॉकलेट कंपनीने आपल्या पॅकेजिंगमध्ये एक खास बदल केला आहे, ज्यामुळे आता मराठी भाषा थेट चॉकलेटच्या रॅपरवर दिसत आहे. ‘जरा जरा मराठी…’ या घोषणेसह कॅडबरीने इंग्रजी आणि मराठीतील काही सोपी वाक्ये छापली आहेत. यामुळे सोशल मीडियावरया उपक्रमाचे […]Read More

देश विदेश

पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक

नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनानिमित्त, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) प्रवाशांसाठी एक मोठी भेट दिली. NHAI ने १५ ऑगस्ट रोजी FASTag वार्षिक पास लाँच केला आणि पहिल्याच दिवशी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. योजनेच्या पहिल्याच दिवशी सुमारे १.४ लाख FASTag वापरकर्त्यांनी हा पास खरेदी केला, ज्यामुळे प्रवाशांना त्याची खूप दिवसांपासून गरज होती हे स्पष्ट झाले. FASTag वार्षिक पास […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पुणे दि. १६ — खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन […]Read More

राजकीय

सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, पहिल्या टप्यात ५० कोटींची

अहिल्यानगार दि १६:– विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्रीक्षेत्र चोंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने चोंडीच्या सिना नदीवर २ बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी १५० कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. संभाव्य पर्जन्यमानः कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता. मराठवाडा […]Read More

गॅलरी

बारवी धरण भरले, पाण्याचा विसर्ग सुरू

ठाणे दि १६ — ठाणे, मिराभाईंदर आणि भिवंडी मनपा हद्दीत पाणी पुरवठा करणारा बारवी तलाव भरून वाहू लागला आहे. मुरबाड तालुक्यात असणाऱ्या MIDC च्या मालकीच्या या धरणातून ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सोबतच या तीन शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो.Read More

विदर्भ

किनखेडा गावात ढगफुटी, नदी नाल्याना पूर ….

वाशीम दि १६:– वाशीम जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून मागील एका तासापासून सध्या संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वाशिम तालुक्यातील किनखेडा गाव परिसरात आज दुपारी ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचले तर अनेक घरांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असून घरगुती साहित्याचे नुकसान […]Read More

मराठवाडा

मांजरा प्रकल्प ९० टक्के भरला, नदीपात्रात ३४९४.२८ क्युसेक्स इतका विसर्ग…

लातूर दि १६:– लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प ९० टक्के क्षमतेने भरला आहे. पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दुपारी सव्वादोनच्या दरम्यान मांजरा प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात ३४९४.२८ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी काठावरील […]Read More

मराठवाडा

शिवना टाकळी धरणाचे तीन दरवाजे उघडले, नदीला मोठा पूर …

छ. संभाजीनगर दि १६ : जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या शिवना टाकळी धरण 93.49 टक्के भरले आहे. त्यामुळं धरणाचे तीन दरवाजे 20 इंचानी उघडण्यात आले आहे. तीन दरवाजे 2280 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर लासुर स्टेशन येथे शिवना नदीला […]Read More

गॅलरी

ठाण्यात दहीहंडी थरांचा विश्वविक्रम…

ठाणे दि १६– संस्कृति युवा प्रतिष्ठान दही हंडी या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दही हंडी उत्सव कार्यक्रमात आज १० थरांची विश्वविक्रमी सलामी देण्यात आली . कोकण नगर गोविंदा पथकाने हे दहा थर रचून विश्वविक्रम नोंदविला आहे.Read More