mmcnews mmcnews

राजकीय

विद्यार्थी विकसित भारताचे भविष्य – आमदार शंकर जगताप

पुणे, दि १६- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. आजचे पुरस्कार प्राप्त विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. गेल्या २१ वर्षांपासून पिंपळे निलख येथील सचिन साठे सोशल फाऊंडेशन विद्यार्थ्यांचा व समाजातील मान्यवरांचा गुणगौरव करून समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवीत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

दूधगंगा धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस, सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर दि १७ — दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलगपणे सुरु असलेल्या पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता आज सकाळी 11.00 वाजता विद्युत निर्मिती केंद्रातून 1500 घनफूट प्रतिसेकंद विसर्ग दूधगंगा नदीपात्रामध्ये सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रामधील पाणी पातळी मध्ये वाढ होणारआहे. पावसाचं प्रमाण, पाण्याची आवक यांस अनुसरून आवश्यकतेनुसार विसर्ग […]Read More

देश विदेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली दि १७ :– महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या १८ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केली असून, यात विशेषतः निवडणूक आयोगाने सायंकाळी ६ नंतर टाकलेल्या तब्बल ७६ लाख मतांचा डेटा जतन करून न ठेवण्याबाबत गंभीर आक्षेप नोंदवला आहे.वंचित […]Read More

विदर्भ

वर्धा नदीला पूर, भोयेगाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली …

चंद्रपूर दि १७:– चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून गडचांदूर मार्गावरील भोयेगाव पुलावरून यंदा दुसऱ्यांदा पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचांदूर-चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील दमदार पावसाने वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी […]Read More

मराठवाडा

धारशिवमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती, एकाचा मृत्यू…

धाराशिव दि १७ — जिल्ह्यातील कळंब तालुक्यात 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मांजरा तेरणा आणि वासेरा या तिन्ही नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक गाव प्रभावित झाले आहेत तालुक्यातील 24 गावातील शेती पिकांचं आणि नदीकाठच्या घरांचं नुकसान झालं आहे अशी माहिती तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दिले आहे. दरम्यान या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या […]Read More

खान्देश

मोठ्या प्रतिक्षेनंतर धुळ्यात जोरदार पाऊस….

धुळे दि १७– अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धुळ्यात काल सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. निम्मा ऑगस्ट महिना उलटूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते, मात्र आजच्या पावसामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे शहरातील अनेक सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यामध्ये जिल्हा रुग्णालय परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि इतर […]Read More

महानगर

दहीहंडी फोडताना मुंबई महानगरात एकाचा मृत्यू तर ९२ गोविंदा जखमी

मुंबई, दि. 16 : वरुणराजाची प्रचंड बरसात सुरु असताना देखील आज मुंबई महानगर आणि परिसरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या थरारक उपक्रमाला गालबोट लागले असून मुंबई महानगरात एक गोविंदाचा मृत्यू झाला असून तर ९२ गोविंदा जखमी झाले तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. प्रा.आ.व्य.कक्ष – ठा.म.पा.:- आज दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहीहंडी […]Read More

राजकीय

ट्रम्प- पुतिन यांची बहुप्रतिक्षित भेट, पुतिन यांनी सर्वांसमक्ष तोडला अमेरिकी

अलास्का, दि. १६ : जागतिक स्तरावर सर्वच माध्यमांचं लक्ष या एका बहुप्रतिक्षित भेटीकडे लागलं होतं. अलास्काच्या एंकोरेज इथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची काल भेट झाली आणि या बैठकीतून पश्चिमी रशियातील तणावावर काही अंशी तोडगा निघाल्याचंही म्हटलं गेलं. शुक्रवारी साधारण तीन तासांसाठी पुतिन आणि ट्रम्प यांच्याल मोठी शिखर बैठक आणि चर्चा झाली. […]Read More

महानगर

मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी

मुंबई, दि. १६ : मुंबईत पागडी तत्वावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित आहे.काही इमारती कधीही कोसळतील अशा बेतात आहेत. अशा इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या ५० पागडी धारकांनी शिवसेना उबाठाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray)यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. याप्रसंगी आधी पुनर्वसन केल्याशिवाय पागडीधारकांना इमारतींमधून बाहेर काढू […]Read More

ट्रेण्डिंग

NCERT ने काँग्रेसला धरले फाळणीसाठी सर्वस्वी जबाबदार

नवी दिल्ली– NCERT ने आपल्या सुधारित अभ्यासक्रमात फाळणीचे गुन्हेगार या मथळ्याखाली एक नवा धडा समाविष्ट केला असून त्यात भारताच्या फाळणीचे सर्व खापर काँग्रेस पक्षावर फोडण्यात आले आहे. त्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. एनसीईआरटीने (NCERT)इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीसाठी नवा अभ्यासक्रम लागू केला आहे. त्यामध्ये देशाच्या फाळणीच्या भीषणतेवर फाळणीचे गुन्हेगार असा एक […]Read More