मुंबई, दि. २९ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी व दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगाने आज दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी […]Read More
बंगळुरू येथील एका खासगी तंत्रज्ञान कंपनीने नुकतीच एक भरती जाहिरात प्रसिद्ध केली असून, त्यात उमेदवारांना दररोज १६ तास काम करण्याची तयारी असावी, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. ही भरती सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि क्लायंट सपोर्ट अशा विविध विभागांसाठी असून, कंपनीने उच्च पगार, जलद पदोन्नती आणि विदेशी प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी असे आकर्षक लाभही […]Read More
मुंबई, दि २९‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था’ ही मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच मुंबईच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचा विचार करताना इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसोबतच मोनो व मेट्रो रेल यांचाही समग्र व स्वतंत्र विचार करणे, अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापन अधिकाधिक प्रभावी होण्याकरिता मोनो व मेट्रो सेवा प्राधिकरणांनी त्यांच्या स्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापन […]Read More
मुंबई, दि. २९ : ह्युमन कोकेन हा चित्रपट प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलच्या काळोख्या, भयानक आणि अनाकलनीय अश्या जगात घेऊन जाणार आहे. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग पुन्हा एकदा एका तीव्र, आव्हानात्मक आणि भावनिक भूमिका साकारताना दिसणार आहे.’जबरदस्त’ या मराठी चित्रपटातून […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ : रशियाचे SJ-100 नागरी प्रवासी विमान आता भारतात तयार केले जाईल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनसोबत एक सामंजस्य करार केला आहे. हे लहान शहरांना हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या उडान योजनेसाठी एक गेम चेंजर ठरू शकते. २८ ऑक्टोबर रोजी मॉस्को येथे HAL चे प्रभात रंजन आणि PJSC-UAC चे ओलेग बोगोमोलोव्ह […]Read More
मुंबई, दि. २९ : मलबार हिलमधील ‘एलिव्हेटेड नेचर ट्रेल’ पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत तब्बल १.८१ लाख पर्यटकांनी या हिरव्यागार वाटेवरून चालत पावसाचा आनंद घेतला. मार्च महिन्यात उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंत सुमारे २.९८ लाखांनी येथे भेट दिली असून, पालिकेला या माध्यमातून ७२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सिंगापूरच्या उंचावरच्या ट्रीटॉप […]Read More
मुंबई, दि. २९ : ‘ द ताज स्टोरी ‘ हा सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच आता कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.दिल्ली उच्च न्यायालयानं ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे. या चित्रपटावर ऐतिहासिक तथ्ये विकृत करण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा […]Read More
मुंबई, दि. 29 : अनोळखी नंबरवरून कॉल आल्यावर आता तुमच्या मोबाईल फोनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरऐवजी त्याचे नाव दिसेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही ॲपचा वापर करावा लागणार नाही. दूरसंचार नियामक TRAI आणि DOT (दूरसंचार विभाग) यांनी फोन कॉल फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. हे नाव वापरकर्त्याने मोबाईल कनेक्शन खरेदी करताना दिलेल्या आयडी प्रूफमध्ये दिलेल्या नावासारखेच […]Read More
सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करासार्वजनिक
मुंबई, दि २९सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी संबंधित विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या महामार्गावरील रस्त्यांची प्रगती, कराड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, तसेच साखर हंगामामुळे वाढलेली ऊस वाहतूक याबाबत आज सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत मंत्री भोंसले यांनी अधिकाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक […]Read More
मुंबई दि २९ : आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्गो येथील शेकडो कामगारांचा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल कामगार कर्मचारी संघ अध्यक्ष आमदार रविंद्रजी चव्हाण प्रमुख उपस्थिती मध्ये पक्षप्रवेश करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टर्मिनल- २ येथील अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे महासचिव सुहास माटे, […]Read More