मादी अस्वलाने पिल्लांना पाठीवर बसवून केला प्रवास.
चंद्रपूर दि २२ :– चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मादी अस्वलाने दोन पिल्लांना पाठीवर बसवून २ ते ३ किलोमीटरचा प्रवास केल्याचे दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मादी अस्वलाची आईपणाची ही जिवंत उदाहरणे वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी मोहर्ली कोअर झोनच्या जुनी विहीर मार्गावर टिपली. दाट जंगलातून सावधपणे मार्गक्रमण करताना तिने पिल्लांना सुरक्षित नेले. आई अस्वली किती सजग असते याचे प्रभावी उदाहरण या दृश्यातून पाहायला मिळाले.ML/ML/MS