मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर

 मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर

मुंबई, दि. 21 : 1 मे पासून राज्यातील रिक्षावाल्यांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले असून भाषा न आल्यास त्याचा परवाना रद्द होणार आहे. या सक्ती विरोधात आक्रमक भूमिका घेत रिक्षावाल्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन या रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारला आहे. 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

युनियनच्या नेत्यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) 5 लाख चालकांचा समावेश आहे. सरकारने हा आदेश मागे न घेतल्यास दररोज निदर्शने केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आंदोलन सुरू करण्यापूर्वी, युनियन 28 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देणार आहेत. १ मे पासून हा नियम लागू होण्यापूर्वीच तो मागे घेण्यात यावा, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *