mmcnews mmcnews

क्रीडा

३६ वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा बुधवारपासून बोपखेलमध्ये-

पुणे, दि, ३: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने होणारी ३६वी किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ५ नोव्हेंबरपासून श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल गावठाण येथे सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची गटवारी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.दरम्यान […]Read More

राजकीय

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या: राजेश

मुंबई, दि, ३ अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये. भाजपा महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार, असा […]Read More

शिक्षण

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ.

पुणे, दि ३: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, पुणे या विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यंदाचा समारंभ राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली, स्वामी विवेकानंद […]Read More

महानगर

आरे, वाकोला व विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुनर्पृष्ठीकरण

मुंबई, दि ३पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (MSRDC) यांच्या मालकीच्या आरे, वाकोला आणि विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण (Resurfacing) करावे. संपूर्ण महामार्गावर वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे. वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांचे अवागमन बंद ठेवावे, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय वाणिज्य व […]Read More

आरोग्य

वेंसर हॉस्पिटलचा गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी अभिनव उपक्रम

पुणे, दि ३: ऑर्थोपेडिक्स आणि नेत्ररोग या क्षेत्रात विशेष सेवा देणारे बहुविशिष्ट वेंसर हॉस्पिटल यांनी गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी अभिनव पुनर्वसन उपक्रम सुरू केला आहे. “48 तासांत पहिले पाऊल” या नावाने ओळखला जाणारा हा कार्यक्रम रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर केवळ दोन दिवसांत सुरक्षितपणे उभे राहणे, चालणे आणि आत्मविश्वासाने घरी परतणे शक्य करतो. हा उपक्रम वेंसर हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाच्या […]Read More

कोकण

वादळातील दोन बोटीवरील खलाशांना वाचवणारा युवक ठरला देवदूत….

अलिबाग दि ३ : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजापाडा येथील अतिश सदानंद कोळी आणि त्याच्या साथीदाराने आपल्या जीवाची बाजी लावून वादळात अडकलेल्या दोन बोटीवरील १५ खलाशांना सुखरूप करंजा येथे आणून त्यांचा जीव वाचवला असल्याने तो त्या १५ खलाशांसाठी देवदूत ठरला आहे. नुकताच निर्माण झालेल्या चक्रीवादळाने रायगड मधील मच्छीमारी साठी गेलेल्या अनेक मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटला […]Read More

राजकीय

अजितदादांची विजयी घोडदौड, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा मोहोर

मुंबई, दि २ : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी सलग ४ वेळा पुन्हा एकदा सर्वसंमतीने निवड झाली आहे. अजित दादांच्या या विजयामुळे राजकारणासोबतच त्यांची क्रीडा क्षेत्रावर सुद्धा भक्कम पकड असल्याचं अधोरेखित झालं आहे. एकूण ३१ क्रीडा संघटनांपैकी तब्बल २२ पेक्षा जास्त संघटनांनी अजित पवार यांच्या […]Read More

महानगर

‘ठाकरे : प्रबोधनकार ते आदित्य ; ठाकरे ब्रँड म्हणजे काय,

मुंबई दि २ : प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जीवनकार्यासंबंधी माहितीपर काही पुस्तके मराठीत प्रकाशित झाली आहेत. पण प्रबोधनकार, बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य या ठाकरे कुटुंबातील व्यक्तींवर एकत्रित माहिती असलेले ‘ठाकरे – प्रबोधनकार ते आदित्य’ असे पुस्तक प्रथमच मराठी साहित्यक्षेत्राच्या दालनात दाखल झाले आहे.लेखक – पत्रकार आणि शिवसेना अभ्यासक योगेंद्र ठाकूर यांनी […]Read More

साहित्य

“दाही दिशा”, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विचारप्रवासाचे प्रेरणादायी प्रतिबिंब

मुंबई, दि. २ :महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित “दाही दिशा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील यशोदर्शन सभागृहात पार पडणार आहे. शब्द आणि विचारांचा संगम अनुभवांच्या प्रवासातून जेव्हा साकारतो, तेव्हा जन्म घेतो एक सजीव आणि प्रेरणादायी ग्रंथ — “दाही दिशा”. या […]Read More

ऍग्रो

सीताफळांच्या झाडांवर शेतकऱ्याने फिरवला जेसीबी

जालना दि २ : जालन्यातील एका शेतकऱ्याने 400 सीताफळांच्या झाडांवर जेसीबी फिरवला आहे. सीताफळ बागेतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आपली 7 वर्षे जोपासलेली बाग नष्ट केली आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील नळविहिरा येथे घडली आहे. नळविहिरा येथील शंकर भिकाजी गाडेकर या शेतकऱ्याने 7 वर्षांपूर्वी आपल्या शेतात मोठ्या मेहनतीने 400 सीताफळांच्या झाडांची लागवड […]Read More