Month: March 2026

महानगर

विक्रोळीतील पीएपी घोटाळा “मतदारांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच” : आमदार

मुंबई, दि १८: विक्रोळी मतदारसंघातील नागरिकांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेत आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत मोठा मुद्दा उपस्थित करत रुणवाल बिल्डरशी संबंधित कथित पीएपी घोटाळा उघडकीस आणला. “जोपर्यंत माझ्या मतदारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा ठाम इशारा देत राऊत यांनी प्रशासनाला धारेवर धरले.विक्रोळीतील ३२ एकर जागेवर रुणवाल बिल्डरकडून सुरू असलेल्या मोठ्या […]Read More

महानगर

सायन-कोळीवाडा एसआरए प्रकल्पात ११.२५ कोटींचे थकीत भाडे, रहिवाशांची सरकारकडे न्यायाची

मुंबई, दि १८:सायन-कोळीवाडा परिसरातील निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या एसआरए प्रकल्पात गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत रहिवाशांनी राज्य सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. या संदर्भात जोसेफ शांतीमानव आणि मोहन गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.या प्रकल्पाचे विकासक हलकारा बिल्डर आणि त्यांचे भागीदार कॉसमॉस लँडमार्क यांनी अनेक […]Read More

महानगर

कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकावर ठेवलेल्या पत्र्यांमुळे रेल्वे प्रवाशी जखमी

मुंबई, दि १८हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मोठ्या प्रमाणात कंत्राटदाराने जुने पत्रे ठेवलेले आहेत. हे पत्र रेल्वे प्रवाशांच्या पायाला लागून गंभीर दुखापत होत आहे. कॉटन रेल्वे स्थानकावर फलक क्रमांक एकच्या दिशेला पादचारी पुलाचे काम चालू आहे त्यामुळे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने […]Read More

राजकीय

बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आता कायद्यात सुधारणा…

मुंबई दि १८ : बिबट्यांना पकडणे त्यांच्यावर उपचार करणे किंवा त्यांचा स्थलांतर करणे यासाठी सध्या केंद्र सरकारच्या वन्यजीव मंडळाला असलेले अधिकार राज्याच्या वन्यजीव मंडळाकडे घेण्यासाठी कायद्यात बदल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले, यामुळे बिबट्यांना मारणे किंवा त्यांना धोका निर्माण करणे याला परवानगी मिळणार नाही असे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. राज्यात काही वर्षात […]Read More

राजकीय

राज्यात आता सीटीएस आणि सर्वे क्रमांकानुुसार स्वतंत्र रेडिरेकनर दर

मुंबई दि १८ : आता यापुढे राज्यात प्रत्येक सीटीएस नकाशाला तसेच सर्वे क्रमांकासाठी स्वतंत्र रेडीरेकनरचा दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. हा निर्णय आधी मुंबईसाठी लागू होईल आणि मग पुढील तीन वर्षात संपूर्ण राज्यासाठी लागू केला जाईल, हा निर्णय पुढील वर्षापासून लागू होईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. मुद्रांक शुल्क […]Read More

राजकीय

मुंबईकरांच्या हक्कासाठी संसदेत खा.संजय दिना पाटील यांची जोरदार भूमिका

मुंबई, दि. १८ – मुंबईकरांच्या दैनंदिन अडचणी, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संसदेत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी अत्यंत ठाम, आक्रमक व प्रभावी पद्धतीने आवाज उठवला. जनतेच्या प्रश्नांवर तडजोड नाही, हीच भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका करताना, त्यांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना केली जात आहे. असा प्रश्न […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

२८-२९ मार्चला महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

सोलापूर, दि. १७ : येथे २८ आणि २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने तीन […]Read More

ट्रेण्डिंग

धुरंधर 2 – ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सर्व शोज हाऊसफुल

मुंबई, दि. १७ : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर- १ च्या प्रचंड यशानंतर त्याचा दुसरा भाग ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शित व्हायला आता दोन दिवस राहिले आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफुल झाले आहेत. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनच्या बाबतीत रणवीर सिंहचा हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडत आहे. ‘धुरंधर 2’चे लाखो तिकिट्स विकले […]Read More

महानगर

जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर कचऱ्याचे ढिग

मुंबई, दि. १७ : मुंबईच्या अगदी नजिक समुद्रात वसलेले घारापुरी अर्थात एलिफंटा हे जागतिक वारसा स्थळ सध्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे त्रस्त झाले आहे. काल राबवण्यात आलेल्या एका विशेष स्वच्छता मोहिमेत ५०० मीटरच्या परिघातून २.५ टन कचरा हटवण्यात आला. या मोहिमेने मुंबई आणि आसपासच्या सागरी प्रदूषणाची भयावह स्थिती पुन्हा एकदा समोर आणली आहे. वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला

सांगोला, दि. १७ : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर सुरक्षित ठेवणारी ‘स्ट्राँग रूम’ फोडून भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरून नेल्याची धक्कादायक घटना सांगोला विद्यामंदिर प्रशालेत उघडकीस आली आहे. गुरूवारी होणाऱ्या भूगोलाच्या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, आता बोर्ड काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या पेपर […]Read More