mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

हिंद महासागरातील या पर्वतावर ताबा मिळवण्यासाठी भारत, चीन, श्रीलंकेमध्ये चढाओढ

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंद महासागराच्या मध्यभागी सापडलेल्या कोबाल्ट पर्वतावर खाणकाम करण्याबाबत भारताने दिलेला प्रस्ताव आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणाने (आयएसए) फेटाळला आहे. भारताच्या दक्षिणेकडील टोकापासून १ हजार ३५० किलोमीटर अंतरावर हिंद महासागरामध्ये हा पर्वत सापडला आहे.भारत आणि श्रीलंका या पर्वतावर दावा सांगत आहेत. हा पर्वत भारतापेक्षा श्रीलंकेच्या जवळ आहे. कोबाल्टचा हा पर्वत […]Read More

खान्देश

संत श्री निवृत्तीनाथ महारांजांची पालखी झाली रवाना

नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दर वर्षीप्रमाणे यंदाही त्र्यंबकेश्वरमधून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने भक्तीमय वातावरणात प्रस्थान ठेवले. पहाटेच्या सुमारास पारंपारिक पूजा विधि झाल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी वारकऱ्यांच्या विठुरायाच्या जयघोषांनी त्र्यंबकनगरी दुमदुमली गेली होती. पहाटे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिरात […]Read More

महानगर

ठाणे नाशिक हायवेवर लांबच लांब रांगा, मोठी वाहतूक कोंडी

ठाणे, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाऊस आणि रस्त्यांची कामे यामुळे मुंबई नाशिक हायवेवर भिवंडी , कळवा , खारेगाव टोलनाका इथे मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खारेगाव टोल नाक्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. दुपारी सुमारे दोन तासापासून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. […]Read More

ट्रेण्डिंग

भारताचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे ५२ व्या वर्षी निधन;

भारताचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांनी ५२ व्या वर्षी स्वतःचे जीवन संपवले आहे. या धक्कादायक घटनेने क्रिकेटप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. डेव्हिड जॉन्सन हे भारतीय क्रिकेट संघाचे महत्त्वाचे खेळाडू होते आणि त्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र दुःख आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जॉन्सन यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत भारतासाठी दोन टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. त्यांनी आपल्या […]Read More

राजकीय

आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना ५ लाखांपर्यत मिळणार मोफत उपचार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नुकताच आदेश […]Read More

कोकण

शिवराज्याभिषेक सोहळा, जलाभिषेक, सुवर्णाभिषेक…

महाड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड मधील दुर्गराज रायगड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर आज तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड तसेच कोकण कडा मित्र मंडळ, यांचे संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष […]Read More

ट्रेण्डिंग

तामिळनाडूमध्ये विषारी दारूने २५ जणांचा मृत्यू; ६० जणांवर उपचार सुरू

तामिळनाडूतील एका गावात विषारी दारू सेवन केल्याने २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण प्रदेशात खळबळ उडवली आहे. विषारी दारूमुळे गंभीर परिस्थितीत असलेल्या ६० जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण उघडकीस येताच स्थानिक प्रशासनाने तातडीने हालचाल केली आणि सर्व प्रभावितांना रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आणि […]Read More

पर्यावरण

मानवतावादी दृष्टिकोन आणि देशांच्या संसाधनांच्या मर्यादा यात समतोल हवा

आधुनिक काळात शरणार्थी म्हणजेच निर्वासितांचा प्रश्न अधिकाधिक संवेदनशील आणि महत्वाचा होत चालला आहे. जगभरातील मानवतावादी व्यवस्था सांभाळली जावी. समानता, न्याय आणि परोपकार ही मूल्ये लक्षात घेऊन निर्वासितांकडे पाहिले जावे, या उद्दिष्टाने संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबर 2000 मधे 20 जून हा दिवस जागतिक निर्वासित दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. निर्वासितांच्या समस्येप्रती हा दिवस समर्पित आहे. शरणार्थी […]Read More

Uncategorized

नारायण राणे यांची निवड रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला नोटीस

मुंबई दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क):रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी याबाबतची कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. […]Read More

पर्यटन

लोणावळा शहरात दिवसा जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी

लोणावळा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोणावळा शहरामधून जाणाऱ्या जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेमध्ये अवजड वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आहेत. त्यामुळे आता लोणावळ्यात अवजड वाहनांना फक्त रात्री प्रवेश मिळणार आहे.लोणावळा शहरातून जुन्या मुंबई- पुणे महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात […]Read More