पंतप्रधान मोदींच्या UAE दौऱ्यात खनिज तेल, LPG बद्दल महत्त्वाचे करार
अबुधाबी, दि. 15 : आज झालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यासाठी कारण ठरलेल्या इराण-अमेरिका युद्धाच्या दरम्या आज सुरू झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा UAE दौरा विशेष महत्त्वाचा ठरत आहे. पंतप्रधानांचा UAE दौरा अवघ्या अडीच तासांचा होता. या कालावधीत महत्त्वाचे करार करण्यात आले. याचे फायदे येत्या काळात पाहायला मिळतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाचे करार झाले. सोबतच अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या घोषणादेखील झाल्या. करार- भारत आणि UAE यांच्यात LPG च्या पुरवठ्यासंदर्भातही करार झाला आहे. भारताला स्थिर आणि दीर्घ कालीन ऊर्जा पुरवठा होत राहावा यासाठी हा करार करण्यात आला आहे. सध्या भारताच्या एकूण LPG गरजेपैकी ४० टक्के पुरवठा UAE कडून होतो.
मध्य पूर्वेत गेल्या अडीच महिन्यांपूर्वी तणाव असताना पंतप्रधान मोदींनी UAE चा दौरा केला. जागतिक तेल बाजारात अस्थिरता असताना मोदींनी केलेला दौरा महत्त्वाचा आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी सागरी वाहतूक सुरक्षित राहिलेली नाही. या स्थितीत दोन्ही देशांमध्ये स्थिरता, आर्थिक मजबुतीवर विशेष भर दिला.
पेट्रोलियम साठ्यासंदर्भात सामंजस्य करार- ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांनी ‘स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ (सामरिक पेट्रोलियम साठा) संदर्भात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. जागतिक खनिज तेल बाजारातील अस्थिरता आणि प्रादेशिक तणावाच्या परिस्थितीतही पुरवठा विस्कळीत होऊ न देणं या हेतूनं हा करार करण्यात आला आहे. भारताची ऊर्जा सुरक्षेला बळकटी करण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे.
अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी आधीपासूनच भारताचं भूमिगत तेल भंडारात तेल साठा करणारी एकमेव परदेशी कंपनी आहे. नव्या करारामुळे ऊर्जा पुरवठा अखंडित राहील