मध्यप्रदेशातील भोजशाला मस्जिद नव्हे मंदीरच – न्यायालयाकडून स्पष्ट

 मध्यप्रदेशातील भोजशाला मस्जिद नव्हे मंदीरच – न्यायालयाकडून स्पष्ट

इंदौर, दि. १५ : मध्य प्रदेशातील धार येथील शतकांपासून वादग्रस्त राहिलेला ऐतिहासिक भोजशाला परिसर हे मंदिरच आहे, असा ऐतिहासिक आणि अत्यंत मोठा निर्णय इंदूर उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयाच्या निर्णयाची सविस्तर माहिती दिली.

भोजशाला परिसर आणि कमाल मशिदीचा वादग्रस्त भाग हे संस्कृत शिक्षणाचे केंद्र आणि मंदिर असल्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयानंतर आता या ऐतिहासिक वास्तूमध्ये मुस्लिम पक्षाला नमाज पठण करता येणार नसून तिथे केवळ हिंदूंनाच पूजाअर्चा करण्याचा अधिकार असणार आहे. या परिसरामध्ये केंद्र सरकार देवी सरस्वतीची मूर्ती आणून स्थापित करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या वादग्रस्त ठरलेल्या मूळ परिसरावर मुस्लिम पक्षाचा कोणताही कायदेशीर हक्क नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, कमाल मशिदीसाठी मुस्लिम पक्ष सरकारकडे वेगळ्या जागेची मागणी करू शकतो आणि सरकारने मुस्लिम समाजाला मशिदीसाठी पर्यायी जमीन उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने सरकारला या वास्तूच्या व्यवस्थापनासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण परिसरावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय (ASI) चे पूर्ण नियंत्रण कायम राहणार आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *