mmcnews mmcnews

सांस्कृतिक

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर तालुक्यात दाखल

सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात दाखल झाला. वेळापूर च्या पुढे ठाकूरबुवांच्या समाधी जवळ माऊलींचे गोल रिंगण झाले. त्या गोल रिंगणात टाळाचे आणि भजनाच्या निनादात सारेच वारकरी तल्लीन झाले होते. पंढरपूर जवळ येत असल्याने फुगड्या खेळत वारकऱ्यांनी टाळांच्या जयघोषणात आनंद व्यक्त केला. https://youtu.be/FEx3jFJ60eE आज ज्ञानेश्वर महाराजांचा […]Read More

कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती…

रत्नागिरी, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील इतर नद्या देखील इशारा पातळीवर वाढत आहे. सर्वाच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धोक्याच्या पातळीवर वहात असलेल्या जगबुडी […]Read More

महानगर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबईला जागतिक स्तरावर थिंक टँक बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड […]Read More

ट्रेण्डिंग

आता आनंदी क्षणांत सहभागी होण्यासाठीही कैद्यांना मिळू शकतो पॅरोल

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने आज पुढील शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या मुलाची पाठवणी करण्याकरीता खुनाच्या आरोपांतील दोषसिद्ध आरोपीला १० दिवसांचा पॅरोल मंजूर केला.दोषसिद्ध आरोपीला वैद्यकीय कारणास्तव किंवा आकस्मिक परिस्थितीत कुटुबीयांच्या दुःखात सहभागी होता यावे यासाठी पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. तर आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी पॅरोल का मंजूर केला जाऊ नाही […]Read More

मनोरंजन

प्रभासच्या ‘कल्की : २८९८ एडी’ ने पार केला हजार कोटींचा

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘कल्की : २८९८ एडी’ ( Kalki: 2898AD ) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर १ हजार कोटी कमाईचा टप्पा पार करत विशेष कामगिरी केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या १६ व्या दिवशीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा आपला दबदबा कायम ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या […]Read More

देश विदेश

जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकार कक्षेत वाढ

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मिर राज्यासाठी असलेलं राज्यघटनेतील ३७० कलम काढून टाकण्यात आल्यानंतर मोदी सरकार तेथील प्रशासकीय रचनेतही मोठे बदल करत आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ केली आहे. त्यानुसार आता जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांना पोलीस आणि प्रशासकीय सेवेसंदर्भातील काही अधिकार प्राप्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये […]Read More

महिला

५ लाख महिलांचा महामोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध मागण्या मागील काही वर्षापासून अद्याप प्रलंबित आहेत. शासनाने वेळोवेळी आश्वासने देवून देखील अद्याप मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. न्याय न मिळाल्यास जुलैमध्ये मुंबई येथे मोर्चा काढण्याचा इशारा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने दिला होता. […]Read More

पर्यावरण

प्रत्यक्षात कत्तल ५५०पेक्षा जास्त झाडांची? यंत्रणेकडून चुकीचे आकडे दिल्याचा आरोप

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पैठण रोडसह शहर परिसरातील इतर अनेक रस्त्यांवरची शेकडो झाडे काही वर्षांत तोडल्यानंतर आता नगर नाका ते दौलताबाद रस्त्यावरचे जुने वृक्ष तोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची संख्या साडेतीनशे असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात साडेपाचशेपेक्षा जास्त झाडे असू शकतात, […]Read More

करिअर

सैनिक शाळेत अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सैनिक स्कूल गोलपारा, आसामने अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार शाळेच्या अधिकृत वेबसाइट sainikschoolgoalpara.org ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: पीजीटी (गणित): संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी. पदवी आणि पदव्युत्तर पदवीमध्ये ५०% गुण.किंवा प्रादेशिक शिक्षण महाविद्यालय, NCERT शी संबंधित विषयात M.Sc.Ed; पदवी आणि पदव्युत्तर […]Read More

Lifestyle

मेथीची पातळ भाजी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:एक मेथीची जुडी, एक- दीड मुठ भाजलेले शेंगदाणे किंवा अर्धी वाटी दाण्याचं कुट, ८-१० लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, जीरे, मीठ, हळद, फोडणीपुरतं तेल. क्रमवार पाककृती:मेथीची जुडी निवडून, धूवून, चिरून घ्यावी. शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जीरे आणि मीठ पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. हे सगळे पदार्थ जितके मिळून […]Read More