mmcnews mmcnews

देश विदेश

६१ व्या वर्षी राजू गणपत कोळी यांना ६ डिग्री ब्लॅकबेल्ट

अलिबाग दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या ५० व्या गोल्डन ज्युबली गोशीन- रियु कराटे फेडरेशन मलेशिया आयोजित कराटे स्पर्धा, ब्लॅकबेल्ट परिक्षा, पंच परिक्षा ११ ते १४ डिसेंबर २०२४ असे चार दिवसाचे शिबिर , मेटॉवर हॉटेल सिल्का मलेशिया येथे आयोजित करण्यात आले होते. ६१ वर्षांच्या राजु गणपत कोळी यांनी यात सहावा डिग्री ब्लॅक बेल्ट […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

सातारा, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांच्या हस्ते सातारा येथे शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून अनेक युद्धामध्ये सातारा जिल्ह्यातील सैनिकांनी उत्तम कामगिरी केलेली आहे‌. काश्मीर येथील कुपवाड जिल्ह्यामध्ये दहशतवादी मुकाबला करताना 17 रोजी कर्नल संतोष महाडिक हे शहीद झाले. […]Read More

मराठवाडा

मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी बीडमध्ये निषेध मोर्चा…

बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये आज सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दिवंगत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून ,फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत आज दुपारी बीड मध्ये निषेध मोर्चाला।सुरुवात करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर […]Read More

पर्यटन

डिसेंबर मध्ये नक्की भेट द्यावी असे फिनलंड

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :फिनलंड, विशेषतः लॅपलंडचा उत्तरेकडील प्रदेश, डिसेंबरमध्ये एक स्वप्नवत ठिकाण आहे, जिथे तुम्ही नॉर्दर्न लाईट्सचा जादू अनुभवू शकता आणि हिवाळ्यातील उत्सवांमध्ये स्वतःला मग्न करू शकता. सांताक्लॉजचे अधिकृत “घर” म्हणून ओळखले जाणारे, लॅपलंड जगभरातील पर्यटकांना त्याच्या मोहक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आकर्षित करते. सांताचे मूळ गाव रोव्हानिएमी हे एक आवर्जून भेट देणारे […]Read More

ट्रेण्डिंग

पुढील महिन्यात येणार देशातली पहिली Solar Car

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील संशोधनाला सध्या मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे.पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढत दरांना कंटाळलेल्या ग्राहकांनी आपला मोर्चा आता EV कडे वळवला आहे. यामध्ये अजून अत्याधुनिकता आणणारी देशातील सोलार पॉवरवर धावणारी पहिली कार नवीन वर्षात बाजारात दाखल होणार आहे. पुणे स्थित कंपनी वेवे मोबिलिटी जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या […]Read More

ट्रेण्डिंग

उपराजधानीत वर्षभरात तब्बल १४१ कोटींची सायबर फसवणूक

नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशातील आर्थिक व्यवहार सुलभ झाले असले तरीही याचा गैरवापर करत सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्या भामट्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना तब्बल १४१ कोटींना गंडा घातला आहे. सायबर पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर १३ हजारांवर सायबर फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत, अशी धक्कादायक माहिती नागपूर पोलिसांनी […]Read More

देश विदेश

राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर केल्यास होऊ शकतो 5 लाख रुपये दंड

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणार आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची नावे, छायाचित्रे आणि राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर करणाऱ्या कायद्यातील शिक्षेमध्ये वाढ करून 5 लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचवेळी दोन वेगवेगळ्या मंत्रालयांचे दोन संबंधित कायदे एकत्र करून […]Read More

पर्यटन

रायपाटण येथे सापडला शिवकालीन अनमोल ठेवा

राजापूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली. त्यातून, या शिवकालीन […]Read More

देश विदेश

चीन बांधतोय जगातले सर्वात मोठे धरण, भारतावर होणारा परिणाम वाचा

चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याच्या तयारीत आहे. या सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या उभारणीसाठी जिनपिंग सरकारने मान्यता दिली आहे. हे धरण तिबेट पठाराच्या पूर्व भागात बांधणार आहे. चीनचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लवकरच काम सुरू होणार आहे. याचा परिणाम भारत आणि बांग्लादेशातील लाखो लोकांवर होऊ शकतो. भूकंप आणि पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे […]Read More

राजकीय

डॉ मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांचे काल एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मनमोहन सिंग यांचे पार्थिव भारताच्या राष्ट्रध्वजात म्हणजे तिरंग्यात लपेटून त्यांना मानवंदना देण्यात आली. मनमोहन यांचे पार्थिव उद्या काँग्रेस […]Read More