mmcnews mmcnews

क्रीडा

आजपासून WPL 2026 ला सुरुवात

मुंबई, दि. ९ : आजपासून महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 ची धमाकेदार सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील पहिला सामना DY पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे रंगला आहे. स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेचे सामने दोन सत्रात खेळवले जातील. पहिला टप्पा नवी मुंबईत आणि दुसरा टप्पा […]Read More

पर्यटन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे शिवमंदीर तीन महिने राहणार बंद

पुणे, दि. ९ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक, विकासकामांशी संबंधित कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला […]Read More

महिला

मेट्रो-१ स्थानकांवर सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनची सुविधा

मुंबई, दि. ९ : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो-१ मार्गिकेतील सर्व १२ मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) खासगी कंपन्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत सिरोना या नामांकित कंपनीसोबत भागीदारी करण्यात आली असून, बहुउत्पादन मासिक पाळी स्वच्छता […]Read More

विज्ञान

अंतराळवीराची तब्येत बिघडल्याने NASA ने थांबवली मोहिम

वॉशिग्टन डीसी, दि. ९ : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका अंतराळवीराची प्रकृती बिघडलेल्या NASA ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुरू असलेले एक अभियान मध्येच थांबवले आहे. NASA ने चार सदस्यांच्या क्रू-11 पथकाला काही दिवसांत पृथ्वीवर परत बोलावण्याचा निर्णय घेतला घडले आहे की, वैद्यकीय समस्येमुळे क्रूला वेळेआधी परत आणले जात आहे. NASA चे प्रमुख जेरेड आयझॅकमॅन […]Read More

ट्रेण्डिंग

अयोध्येत नॉनव्हेजच्या डिलिव्हरीवर बंदी

अयोध्या, दि. ९ : अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि पंचकोशी परिक्रमा मार्गाच्या आसपास मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ऑनलाइन अन्न वितरण करणाऱ्या कंपन्यांनाही लागू करण्यात आला आहे. या संदर्भात हॉटेल, होम स्टे आणि ऑनलाइन अन्न वितरण करणाऱ्या कंपन्यांना अवगत करण्यात आले आहे. त्यांना इशारा देण्यात आला आहे. उल्लंघन केल्यास कारवाई केली […]Read More

राजकीय

सत्तेवर आल्यानंतर स्थगिती आघाडीचा मुंबईच्या विकासाला पुन्हा ब्रेक ?

कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांना कवेत घेणारी मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताची आर्थिक नाडी आहे. अहोरात्र धावणारे शहर या शहराची ओळख. परंतु, गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट विशेषत्त्वाने जाणवते की, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुतीचे सरकार सत्तेत येते , तेव्हा मुंबई धावते; आणि जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी (मविआ) नावाचा प्रयोग होतो, […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईसह राज्यातील 29 मनपा क्षेत्रांत मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई, दि. 8 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्या दिवशी संबंधित क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका तसेच केंद्रशासनाची कार्यालये यांना लागू राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, […]Read More

ट्रेण्डिंग

पुणे-नागपूर मार्गावरील ‘या’ गाड्या तब्बल 22 दिवस रद्द

पुणे, दि. ८ : पुणे विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे विदर्भ आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. ४ जानेवारी ते २५ जानेवारी २०२६ या २२ दिवसांच्या कालावधीत ३० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलले आहेत. दौंड-काष्टी दरम्यान ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन-इंटरलॉकिंग’चे तांत्रिक काम सुरू असल्याने पुणे-नागपूर गरीब रथ, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूरात उभारला जाणार 129 कोटींचा अत्याधुनिक सुसज्ज दर्शन मंडप

पंढरपूर, दि. ८ : पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी मोठी सुविधा उभारली जात आहे. तब्बल १२९ कोटी रुपये खर्चून गोपाळपूर रोडवरील दोन एकर जागेत अत्याधुनिक दर्शन मंडप तयार होत असून, यात वातानुकूलित रांगा, स्वच्छतागृहे, अन्नछत्र, विश्रामकक्ष, आपत्कालीन मार्ग, प्रथमोपचार केंद्र व अतिदक्षता विभागाची सोय असेल. वयोवृद्ध व दिव्यांग भाविकांसाठी विशेष रेलिंग, लिफ्ट तसेच मंदिरापर्यंत […]Read More

देश विदेश

भारत करणार १२५ देशांच्या International Solar Alliance चे नेतृत्व

नवी दिल्ली, दि. ८ : भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नेतृत्व १२५ देशांसह पुढे चालू ठेवणार असून, देशाची सौर ऊर्जा क्षमता २०२६ पर्यंत तब्बल १३२ गिगावॅटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) ही संस्था १२५ सदस्य देशांसह हवामान बदलावर मात करण्यासाठी सौर ऊर्जा उपाययोजना राबविण्याचे काम पुढेही सुरू ठेवणार आहे. अमेरिकेने या आघाडीतून […]Read More