नवी दिल्ली, 13: देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल आणि यासाठी केंद्र शासन 400 कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual & […]Read More
चेन्नई, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तामिळनाडूमध्ये द्रमुकचे सरकार आहे आणि एमके स्टॅलिन येथे मुख्यमंत्री आहेत. सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ‘₹’ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह वापरले. हे तमिळ लिपीतील ‘रु’ अक्षर आहे.गेल्या एका महिन्यापासून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये हिंदीवरून वाद सुरू आहे. केंद्र सरकार नवीन शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा धोरण लागू करण्यास सांगत आहे. हिंदी आणि […]Read More
मुंबई, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा बनावट चकमकीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी केला. यावर सरकारच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अमित देसाई म्हणाले की, सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. तपासात एन्काउंटर बनावट असल्याचे दिसून आले तर FIR […]Read More
मुंबईसह आठ जिल्ह्यांमधील सन २०२५साठीच्या पहिल्या तुकडीतील ‘अग्रीवीर’ भरतीला सुरुवात झाली आहे. १० एप्रिलपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ‘अग्नीवीर’ ही १६व्या वर्षी (Army Agniveer Bharti 2025 age limit) संरक्षण दलांद्वारे देशसेवा करण्याची संधी देणारी योजना आहे. चार वर्षांची सेवा बजाविल्यानंतर नोकरी सोडायची असल्यास संबंधित ‘अग्नीवीर’ सैनिकाला जवळपास १०.४० लाख रुपये मिळतात. त्याखेरीज दरमहा […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वेकडून सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध यात्रा आयोजित केल्या जातात. रेल्वेने आता जैन समाजाच्या देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी एक विशेष जैन यात्रा आयोजित केली आहे. येत्या ३१ मार्च पासून विशेष भारत गौरव रेल्वेने ही यात्रा सुरु होणार असून त्यासाठी प्रति व्यक्ती २५ हजार रुपये […]Read More
नवी दिल्ली, 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांवर अमानवीय अत्याचार करून देशाला गुलाम बनविणारे इंग्रज आणि मोगलांच्या स्मारकांना नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी संसदेत केली.ठाण्याहून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या करणा—या औरंगजेबाची कबरेचे ऐतिहासीक वारसा म्हणून जतन केले जात आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या 3691 ऐतिहासीक […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील गरजू नागरिकांसह सीमा भागातील नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांमध्ये मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या माध्यमातून सीमावर्ती भागातील गावांना सातत्याने आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. ही मदत अधिक सुलभरित्या कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री सहाय्यता […]Read More
वाशीम, दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीमच्या मोक्षधाम स्मशानभूमीत यंदाही दारू, गुटखा आणि प्लास्टिकच्या होळीने समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सलग १९ व्या वर्षी ‘स्मशान होलिकोत्सव’ साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत केवळ होळी पेटवली गेली नाही, तर दोन तासांचे स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमीही स्वच्छ करण्यात आली.यावेळी गुटखा, सिगारेट, तंबाखू, दारू, प्लास्टिक पिशव्या […]Read More
येत्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपणार आहेत. निकाल लवकर लावण्यासाठी बोर्डाकडून हालचाली सुरू आहे. 15 मेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम वेगानं सुरू आहे. दरम्यान, मुंबईच्या विरारमध्ये 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना समोर आली आहे. १२वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तर पत्रिकांना आग लागली. […]Read More
पुण्यातील १८३० भोंग्यांचं सर्वेक्षण होणार आहे. पुणे शहरामध्ये सर्वधर्मीय धार्मिक स्थळांवर हे भोंगे असल्याची नोंद पोलीसांकडे आहे. सर्वेक्षणादरम्यान अनधिकृत भोंग्यांची माहिती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी ठाण्यांना दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाचं पालन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.राज्य शासनाच्या आदेशानुसार दिवसा 55 डेसिबल, तर संध्याकाळी 45 डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. आवाजाच्या […]Read More