mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

श्री विठ्ठल मूर्तीची मोठी झीज, पुन्हा करावे लागणार रासायनिक लेपन

पंढरपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भक्तगणांच्या भेटीसाठी युगानुयुगे विटेवर उभा ठाकलेल्या पंढरीच्या विठूरायाच्या मूर्तींची आता आतोनात झीज झाली आहे. दररोजचे शोडषोपचार, पूजा, अभिषेक लाखो भाविकांची विठूराया चरणी माथा ठेकवण्याची इच्छा यामुळे ही मूर्ती आता जीर्ण होत आहे. यावर आता लवकरच रासायनिक लेप लावून तिचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. एका महिन्यांपूर्वी पुरातत्त्व खात्याच्या रासायनिक […]Read More

Lifestyle

केरळ स्टाईल अळूवड – पारंपरिक दक्षिण भारतीय कुरकुरीत भाजी

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत तोंडाला पाणी सुटेल अशा वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा समावेश आहे. त्यातील एक म्हणजे केरळ स्टाईल अळूवड, जी कुरकुरीत, मसालेदार आणि चवदार स्नॅक म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्य: कृती: सर्व्हिंग टिप: नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर ही स्नॅक खास लागते. ML/ML/PGB 12 Mar 2025Read More

राजकीय

एस टी घोटाळ्याची चौकशी येत्या महिनाभरात …

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले असं सांगत याच्या मागे कोण आहे ? याची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.काँग्रेसचे राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत […]Read More

ट्रेण्डिंग

भयानक घटना, इंस्टाग्रामवर झालेल्या वादाचा आईला फटका! गाडीवरून नेले फरफट

हरियाणाच्या सोनीपतमध्ये धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. इंस्टाग्रामवरील एका कमेंटवरून दोन किशोरवयीन मुलांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादामध्ये आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, यामुळे एका वेगाने येणाऱ्या कारच्या बोनेटवर आईला जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत ओढत नेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.Read More

महिला

आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद जिंकणाऱ्या महिलांचा सन्मान, मिळालं इतक्या लाखांचं

जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला भारताच्या संघाने आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद 2025 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. सोनाली शिंगटेच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा स्पर्धेत जेतेपद मिळवले. यासाठी भारतीय महिला कबड्डी संघाला मंगळवारी 11 मार्च रोजी गौरवण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला 67 […]Read More

राजकीय

शक्तिपीठ महामार्ग करू , लादणार नाही

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून या महामार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित […]Read More

राजकीय

उशिराने होणाऱ्या जन्ममृत्यू नोंदींचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांमुळे होणाऱ्या विलंबामुळे उशिराने करायच्या जन्म मृत्यू नोंदीसाठी सरकारने नवीन तरतूद केली असून, त्यानुसार एक वर्षाहून अधिक काळ विलंब झाला आहे त्यांची नोंदणी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांना याबाबत नोंद करून संबंधित दाखले देण्याची ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे. यामुळे […]Read More

आरोग्य

कृत्रिम चीज आणि पनीर उत्पादकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात कृत्रिम चीज आणि पनीर तयार करून त्याची विक्री केली जात असून त्यामुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भामध्ये शासन तातडीने गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना विक्रम पाचपुते […]Read More

देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसने दिला सर्वोच्च सन्मान, ठरले पहिलेच भारतीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसने सर्वोच्च सन्मानाने गौरवले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ या देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत. पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा 21 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार […]Read More

राजकीय

राज्यपालांचे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशाचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज बुधवारी (दि १२) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी , पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या […]Read More