mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

लोकप्रिय वेबसिरिज ‘पंचायत’ चा सीझन 4 लवकरच होणार रिलिज

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय दिग्दर्शित ग्रामपंचायती भोवती फिरणारं लुटुपुटुचं राजकारण आणि गावातील साधे राहणीमान मांडणाऱ्या पंचायत या बेवसिरिजया मोठा चाहतावर्ग आहे. या सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या या सीरिजला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ‘प्राइम व्हिडीओ’ने ‘पंचायत 4’ ची […]Read More

राजकीय

मंगेशकर रुग्णालयप्रकरणी चौकशीसाठी समिती गठित

मुंबई दि ४ : – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे […]Read More

मराठवाडा

शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिलांचा मृत्यू आणि तीन महिला

नांदेड दि ४– नांदेड वसमत रोड वरील एका शेतशिवारामध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या – वसमत रोड वरील आलेगाव शिवारात आज सकाळी हा अपघात झाला. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील महिला […]Read More

ट्रेण्डिंग

यंत्रमाग कामगाराचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश

ठाणे दि ४– हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर भिवंडीतील एका यंत्रमाग कामगाराच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातून 41 वा क्रमांक मिळवून न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे. लहानपणापासूनच संघर्ष हेच जणू त्याच्या आयुष्याचे सूत्र होते. घरची गरिबी, आई-वडिलांचे कष्टमय जीवन आणि शिक्षणाच्या वाटेतील अडथळे यांना न जुमानता त्यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. […]Read More

राजकीय

केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा

नवी दिल्ली, दि. 4 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा प्रलंबित निधी राज्याला लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी आज राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली. कृषी भवन येथे गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौहान यांची आज भेट घेतली. […]Read More

पर्यावरण

बीकेसीमध्ये ‘पर्यावरण भवन’साठी भूखंड मंजूर

मुंबई दि ४– : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) ‘पर्यावरण भवन’ या त्यांच्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जी-ब्लॉकमधील सी-७९ क्रमांकाचा भूखंड देण्यास मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १५९ व्या प्राधिकरण बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा निर्णय […]Read More

साहित्य

पुलंचं हे नाटक तब्बल तीन दशकांनी पुन्हा रंगभूमीवर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात लेखक, नाटककार, अभिनेते पु. लं देशपांडे यांच्या अजरामर साहित्यकृती आजही वाचकांना भुरळ घालतात. सुंदर मी होणार ही त्यांची अशीच एक लोकप्रिय नाट्यकृती. या नाटकात खुद्द पुलं आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाईंनी काम केले होते. त्यानंतर श्रीराम लागू, गिरिश ओक, वंदना गुप्ते या प्रसिद्ध कलाकारांनी हे नाटक सादर केले […]Read More

देश विदेश

सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती करणार जाहीर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपापली संपत्ती जाहीर करणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोट्यवधींची रोकड मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. उच्च न्यायालयाच्या […]Read More

महानगर

जुने वाहन मोडीत काढल्यास नवीन वाहनावर १५ टक्के सवलत

मुंबई : एखाद्याचे वाहन जुने झल्यास स्वेच्छेने वाहन मोडीत काढल्यास त्याच प्रकारातील नवीन वाहन खरेदीत तब्बल १५ टक्के सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून ८ वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून […]Read More

राजकीय

राज्य सरकार करणार ३ अत्याधुनिक AI उत्कृष्टता केंद्रांची स्थापना

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील AI तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार अधिक कार्यक्षम प्रशासनासाठी याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मायक्रोसॉफ्टसोबत (Microsoft) एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी […]Read More